देशविदेश
ब्रिटनने हटवले सारे कोरोना निर्बंध; ना मास्कची सक्ती, ना वर्क फ्रॉम होम..

ब्रिटन:- जगाचं एकीकडे कोरोनाशी युद्ध सुरू आहे. मात्र, दुसरीकडे ब्रिटननं आपल्या देशातले सगळे कोरोनाचे निर्बंध हटवलेत. ब्रिटनचे पंतप्रधान बोरीस जॉन्सन यांनी बुधवारी देशात मास्क आणि इतर निर्बंध हटवण्याची घोषणा केली आहे. अशात ब्रिटनमधलं ‘वर्क फ्रॉम होम’ देखील बंद करण्यात आलं आहे.
लोकं मास्क शिवाय सार्वजनिक ठिकाणी फिरू शकतात. मास्क वापरणं ब्रिटनमध्ये बंधनकारक नसेल. याचसोबत शालेय विद्यार्थ्यांना वर्गामध्ये मास्क न घालता बसण्याची परवानगी देण्यात आली आहे. ब्रिटनने घेतलेल्या या निर्णयामुळे जगभरात आश्चर्य व्यक्त केलं जात आहे.
जगात एकीकडे तीस लाखांहून अधिक कोरोनाचे नवीन रुग्ण असताना दुसरीकडे ब्रिटन आपल्या देशातील निर्बंध हटवल्याचे जाहीर केले आहे. ब्रिटनमधील सर्व नागरिकांचे लसीकरण पूर्ण झाल्यामुळे ब्रिटनच्या पंतप्रधानांनी हा निर्णय घेतला आहे.