नवी दिल्ली

‘मध्यमवर्गाचे सशक्तीकरण करणारा अर्थसंकल्प’ – पंतप्रधान 

नवी दिल्ली – एनडीए सरकारच्या तिसऱ्या कार्यकाळातला पहिलाच अर्थसंकल्प आज केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी सादर केला. त्यामुळे “अर्थमंत्री निर्मला सीतारमण आणि त्यांचे सहकारी अभिनंदनास पात्र आहेत. हा अर्थसंकल्प समाजातील प्रत्येक घटकाला शक्ती देणारा आहे. हा देशातील ग्रामीण भागातील गरीबांना समृद्धीच्या वाटेवर नेणारा अर्थसंकल्प आहे. मागच्या दहा वर्षात २५ कोटी लोक गरीबीतून बाहेर निघाले. या माध्यमातून जो नव मध्यम वर्ग तयार झाला. त्यांना या अर्थसंकल्पातून सशक्तीकरण करण्यात आले आहे. युवकांना असंख्य नव्या संधी उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. शिक्षण आणि कौशल्य विकासाला या अर्थसंकल्पातून एक नवी गती मिळेल. मध्यम वर्गाला शक्ती देणारा अर्थसंकल्प आहे. दलित आणि वंचितांना सशक्त करणाऱ्या नव्या योजनांसर हा अर्थसंकल्प समोर आला आहे”, असे गौरवोद्गार पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अर्थसंकल्प सादर केल्यानंतर काढले.

केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी अर्थसंकल्प सादर केल्यानंतर पंतप्रधान मोदींनी त्यावर प्रतिक्रिया दिली. पंतप्रधान मोदी म्हणाले, “या अर्थसंकल्पातून पायाभूत सुविधा आणि उत्पादनावर लक्ष देण्यात आले आहे. यातून आर्थिक विकासाला नवी गती मिळेल आणि गतीमध्येही सातत्य राहिल. रोजगार आणि स्वयंरोजगाराचे अभुतपूर्व संधी निर्माण होईल, हीच आमची ओळख राहिली आहे.”

या अर्थसंकल्पातून सूक्ष्म, लघू, मध्यम औद्योगिक क्षेत्राला नवी चालना मिळाली आहे. ई-कॉमर्स एक्सपोर्ट हब आणि फूड क्वालिटी टेस्टिंगसाठी १०० युनिट स्थापन करण्यात येणार आहेत. यातून वन प्रॉडक्ट, वन डिस्ट्रिक्ट योजनेला गती मिळेल. आमच्या स्टार्टअप आणि संशोधक वृत्तीच्या लोकांसाठी हा अर्थसंकल्प खूप साऱ्या संधी घेऊन आला आहे. अवकाश तंत्रज्ञानाचा विकास करण्यासाठी एक हजार कोटींचा निधी देणे असो किंवा एंजल कर हटविण्याचा निर्णय असो, असे अनेक महत्त्वाचे निर्णय अर्थसंकल्पातून घेण्यात आल्याचे पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button
error: Content is protected !!