महाराष्ट्र

कर्करोग मुक्त भारत राष्ट्रव्यापी मोहीम

कॅन्सर हा एक अधिसूचित आजार म्हणून वर्गीकृत केला जावा. अशी मागणी " युनिफाय टू नोटिफाय " या मोहिमेमध्ये सरकारकडे करण्यात आली आहे.

मुंबई : भारतात दरवर्षी कॅन्सरच्या १४ लाखांहून जास्त केसेस आढळून आल्या असून २०२५ पर्यंत त्यांची संख्या वाढून १५ लाखांवर पोहोचेल. यासाठी जनजागृती करण्यासाठी अपोलो कॅन्सर सेंटर मे जागतिक कॅन्सर दिवसाचे औचित्य साधून एक राष्ट्रव्यापी मोहीम सुरु केली असल्याची माहिती पत्रकार परिषदेत दिली.

कॅन्सर हा एक अधिसूचित आजार म्हणून वर्गीकृत केला जावा. अशी मागणी ” युनिफाय टू नोटिफाय ” या मोहिमेमध्ये सरकारकडे करण्यात आली आहे. यावेळी इंडियन मेडिकल असोसिएशनचे डॉ. घनश्याम दुलेरा यांनी सांगितले की, राष्ट्रीय कॅन्सर रजिस्ट्री मध्ये भारतीयांमध्ये कॅन्सर केसेसची संख्या वेगाने वाढत आहे. त्यामुळे भारत ही जगाची ‘कॅन्सर कॅपिटल’ बनू शकते.

अपोलो हॉस्पिटल्स चे संचालक व वरिष्ठ तज्ञ डॉ.अनिल डिक्रुझ म्हणाले की, “कॅन्सरला एक अधिसूचित आजार बनवल्याने राज्यस्तरावर कॅन्सर बद्दल लोकांची समज बदलेल. तर अपोलो हॉस्पिटल चे विभागीय कार्यकारी अधिकारी अरुणेश पुनेथा म्हणाले की, यामुळे भारतातील कॅन्सर देखभाली संदर्भातील क्रांतिकारी बदल घडून येतील.

देशातील १५ राज्यांनी कॅन्सरला एक अधिसूचित आजार म्हणून आधीच घोषित केले आहे. तर जागतिक पातळीवर अमेरिका, इंग्लंड आणि वेल्स, स्कॉटलंड, डेन्मार्क, नॉर्डिक देश, कॅनडा, ऑस्ट्रेलिया, न्यूझीलंड, इज्राएल, क्युबा, प्युर्टो रिको आणि द गाम्बिया सहित १२ पेक्षा जास्त देशांनी अनिवार्य कॅन्सर रिपोर्टींगचे महत्त्व ओळखले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button
error: Content is protected !!