शिवस्वराज्य दिन सोहळ्या निमित्त मंत्री उदय सामंत महाविद्यालयीन विद्यार्थ्यांसोबत चालले चक्क 3 किलोमीटर.…

सातारा:कॅबीनेट असो किंवा राज्य मंत्री अगदी जवळच जायचे असेल तरी गाडी शिवाय पान हलत नाही.. मात्र राज्याचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री नामदार उदय सामंत यांनी शिवस्वराज्य दिनी वाहन नाकारून महाविद्यालयीन विद्यार्थ्यांसमवेत चक्क ३ किलोमीटर चालून शिवाजी महाराजांना आगळी मानवंदना दिली…
महाविद्यालयातून 6 जून हा दिवस ” शिवस्वराज्य दिन “म्हणून साजरा करण्याबाबत अलिकडेच घोषणा केली होती.त्या अनुषंगाने 3 जुन 2021 रोजी आदेश देखील काढण्यात आला.परंतु गत वर्षी कोरोना संकटामध्ये हा दिवस online कार्यक्रम आयोजित करून साजरा केला गेला होता. यंदा मात्र हा दिवस संपूर्ण राज्यभर विद्यापीठे आणि महाविद्यालयातून अतिशय उत्साहात साजरा केला गेला.
असाच एक शिवस्वराज्य दिन सोहळा सातारा येथे आयोजित करण्यात आला होता.या सोहळ्याला सातारा जिल्ह्यातील महाविद्यालयीन तरुणांचा उत्स्फुर्त सहभाग ,तरुणांनी आयोजित केलेली शोभा यात्रा,शोभा यात्रेला दिलेलं छत्रपतीं शिवाजी महाराजांच्या मावळ्यांच्या सैन्याच रूप,छत्रपती शिवाजी महाराज यांच्या वेशभूषेमधील तरुणाईची उपस्थिती,सजवलेले रथ,महाविद्यालयीन NSS आणि NCC च्या गणवेशधारी विद्यार्थ्यांची सलामी या शोभा यात्रेचा दिमाखदारपणा उठवून दाखवत होती.
नामदार उदय सामंत यांचे साताऱ्यात आगमन होताच साताऱ्यातील पवई नाका येथील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याला अभिवादन केले. त्यानंतर आयोजकांनी त्यांना वाहनाने कार्यक्रम स्थळी नेण्याचं नियोजित केलं होते.परंतु नामदार उदय सामंत यांनी शोभा यात्रेतील सुमारे 3000 विद्यार्थ्यांसमवेत जवळ जवळ 3 किलोमीटर चालून शोभा यात्रेतील सहभागी विदयार्थ्यांचा हुरूप वाढविला.यावेळी गर्जना,जल्लोष यांनी सारा आसमंत शिवमय झाला होता.संपूर्ण सातारा नगरी खऱ्या अर्थाने शिवस्वराज्य दिन साजरा करीत होती.