मुंबईगोरेगाव मिररमनोरंजनमहाराष्ट्र

सिने सृष्टीतील ‘प्रेमळ आई’ सुलोचना दीदी यांचे निधन..

मुंबई (प्रतिनिधी) आपल्या अभिनयाने अवघ्या  हिंदी-मराठी सिने सृष्टीत ‘प्रेमळ आई म्हणून प्रसिद्ध झालेल्या  सुलोचना दीदी यांचे आज निधन झाले. वयाच्या 94 वर्षी सुलोचना दीदी यांनी अखेरचा श्वास घेतला. त्यांच्यावर मुंबईतील रुग्णालयात उपचार सुरू होते.वयोमानानुसार प्रकृती अस्वास्थ्यामुळे सुलोचना दीदी यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. त्यांना श्वास घेण्यास त्रास होत होता. त्यांची प्रकृती बिघडत चालली होती. सुलोचना दीदी यांची शनिवारी प्रकृती चिंताजनक बनली होती.

रात्री उशिरा त्यांना व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आलं होतं. त्याआधी त्यांना ऑक्सिजन दिला जात होता. मार्च महिन्यातही त्यांची प्रकृती बिघडली होती. तेव्हा श्वास घेण्यात अडचण येत होती.३ आठवडे उपचारानंतर त्यांची प्रकृती ठीक झाली होती.मार्च महिन्यात जेव्हा सुलोचना यांची प्रकृती गंभीर झाली होती तेव्हा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उपचाराचा खर्च केला होता. मुख्यमंत्री निधीतून त्यांना उपचारासाठी ३ लाख रुपये देण्यात आले होते असा आहे सुलोचना दीदींचा प्रवास मराठी मातीतील शालीनता, घरंदाज अभिनय आणि सोज्वळतेचा चेहरा म्हणजे सुलोचना दीदी होया. सुलोचना दीदींचं मूळ नाव सुलोचना लाटकर. कोल्हापूरमधल्या खडकलाट गावी सुलोचना दीदींचा जन्म झाला.

250 हून अधिक मराठी आणि 150 हून अधिक हिंदी सिनेमांमध्ये दीदींनी आपल्या अभिनयाचा ठसा उमटवलाय. तंबुतल्या चित्रपटाने सुलोचना दीदींना चित्रपटांची ओढ निर्माण केली. पण त्यांचं खरं शिक्षण झालं ते गुरु भालजी पेंढारकरांच्या मार्गदर्शनाखाली. दीदींनी साकारलेली सोशिक आईची भूमिका म्हणजे केवळ लाजवाब. जय भवानी या सिनेमातून सुलोचना दीदी नायिका म्हणून समोर आल्या.

मराठा तितुका मेळवावा या सिनेमातल्या जीजाऊंच्या भूमिकेमुळे सुलोचना दीदींचं वेगळं रुप समोर आलं. त्याशिवाय वहिनीच्या बांगड्या, भाऊबीज, बाळा जोजो रे, चिमणी पाखरं, प्रपंच, स्त्री जन्मा तुझी ही कहाणी, पारिजातक हे दीदींचे तुफान गाजलेले चित्रपट. मोलकरीण आणि एकटी या सिनेमात दीदींनी साकारलेली सोशिक आईची भूमिका म्हणजे केवळ लाजवाब.. मराठीप्रमाणेच हिंदी पडदाही सुलोचना दीदींनी गाजवला मराठीप्रमाणेच हिंदी पडदाही सुलोचना दीदींनी गाजवला. बिमल रॉय यांच्या सुजाता चित्रपटात त्यांनी साकारलेली संवेदनशील आईची भूमिका बरीच गाजली. हिंदी चित्रपटांमध्ये त्या पडद्यावर अमिताभ बच्चन, धर्मेंद्र, राजेंद्र कुमार, शशी कपूर या आघाडीच्या नायकांच्या त्या आई झाल्या. सुलोचना दीदींना पद्मश्री, महाराष्ट्र भूषण या पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आलं आहे.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ज्येष्ठ अभिनेत्री सुलोचना यांना  वाहिली श्रद्धांजली..

“पडद्यावर आणि पडद्याच्या मागेही चित्रपटसृष्टीवर मायेची पाखर घालणारी ‘आई’ ज्येष्ठ अभिनेत्री सुलोचना लाटकर यांच्या निधनामुळे काळाने आपल्यातून ओढून नेली आहे. मराठीसह, हिंदी चित्रपट सृष्टीने एक लोभस, सहज अभिनयाने अनेकांच्या मनमनात घर केलेली एक महान अभिनेत्री आपण गमावली आहे, अशा शोकमग्न भावना करत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी प्रख्यात अभिनेत्री पद्मश्री, महाराष्ट्र भूषण सुलोचना दीदी यांना निधनाबद्दल भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण केली आहे.

शोकसंदेशात मुख्यमंत्री शिंदे यांनी म्हटले आहे की, सुलोचना दीदींनी मराठी आणि हिंदी चित्रपट सृष्टीत आपल्या अभिनयाचा ठसा उमटवला. त्यांनी आपल्या व्यक्तिरेखांनी विशेषतः ‘आई’च्या भूमिकेने प्रेक्षकांच्या मनात स्थान निर्माण केले. दोन्ही चित्रपट सृष्टीतील अनेक कुटुंबांशी त्यांचे जिव्हाळ्याचे नाते राहिले आहे. त्या जशा पडद्यावर प्रेमळ, सोशिक दिसतं, तश्याच त्या अनेकांसाठी मायेचा आधार होत्या. त्यांच्या निधनामुळे चित्रपट सृष्टीतील अनेकांना पोरकेपणाची भावना निर्माण झाली असेल. काळाने त्यांना आपल्यातून ओढून नेल्याने आपण एक चित्रपटसृष्टीवर मायेची पाखर घालणारी “आई’ गमावली आहे, ज्येष्ठ अभिनेत्री सुलोचना दीदी यांना भावपूर्ण श्रद्धांजली. त्यांच्या कुटुंबियांना आणि चित्रपट सृष्टीतील स्नेह्यांना हा आघात सहन करण्याची ताकद मिळावी, अशी प्रार्थनाही मुख्यमंत्र्यांनी केली आहे. तसेच   सुलोचना दीदी यांच्या पार्थिवावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार* करण्याच्या सूचना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिल्या आहेत.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button
error: Content is protected !!