छत्रपती शिवाजी महाराज ओबीसी होते, महादेव जानकरांचं वक्तव्य

परभणी:- भाजप नेते चंद्रकांत पाटील यांनी केलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांवरील वक्तव्यावर राज्यात वाद सुरू असतानाच दुसरीकडे राष्ट्रीय समाज पक्षाचे अध्यक्ष महादेव जानकर यांनी ‘शिवाजी महाराज ओबीसी होते’,असं वक्तव्य केलं आहे.परभणीतील एका कार्यक्रमात ते बोलत होते.जानकरांनी केलेल्या या वक्तव्यानंतर राजकीय वर्तुळात टिका-टिपण्यांना सुरुवात झाली आहे.
काही दिवसांपूर्वी भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी,छत्रपती शिवाजी महाराजांनी हिंदू व्होट बँक तयार केली,असं वक्तव्य केलं होतं.यानंतर आता महादेव जानकरांनी केलेल्या, ‘छत्रपती शिवाजी महाराज हे ओबीसी होते,या वक्तव्यानंतर राज्यात वाद तापण्याची चिन्ह आहेत.
एवढंच नाही तर,’आम्हाला सत्ता द्या मराठा,ओबीसी,मुसलमान सर्वांना आरक्षण देतो’ असंही ते यावेळी म्हणाले.तसंच आमचं होऊद्या ३०-३५ आमदार,मग बघा या सर्व समाजाला आरक्षण मिळतंय का नाही ते, असंही ते म्हणाले.