लाडकी बहीण लाभार्थी महिलांना शून्य टक्के व्याज

मुंबई – मुंबईकरांच्या विश्वासातील आणि ग्राहकांच्या सुलभ व तत्पर सेवेसाठी अग्रस्थानी असलेल्या मुंबई जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेतर्फे मुख्यमंत्री लाडकी बहीण लाभार्थी महिलांना शून्य टक्के व्याज दराने कर्ज योजना व क्यूआर कोड सुविधेच्या वितरणाचा उदघाटन सोहळा भाजपा गटनेते व बँकेचे अध्यक्ष आमदार प्रविण दरेकर यांच्या शुभहस्ते बुधवार ३ सप्टेंबर २०२५ रोजी पार पडणार आहे.
सदर कार्यक्रम पद्मभूषण वसंतदादा पाटील सभागृह, मुंबई जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक मर्यादित, २०७, मुंबई बँक भवन, पहिला मजला, डॉ. डी. एन. रोड, फोर्ट, मुंबई ०१ येथे दुपारी ३ वाजता पार पडणार आहे. या कार्यक्रमाला लाडक्या बहिणींनी, सहकारातील कार्यकर्त्यांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन निमंत्रक आणि मुंबई बँकेचे उपाध्यक्ष सिद्धार्थ कांबळे, मुख्य सरव्यवस्थापक संदीप सुर्वे, कार्यकारी संचालक डी. एस. कदम यांनी केले आहे.