मनोरंजन

विकी कौशलच्या नावाने फेसबुकवर तरुणीची झाली होती फसवणूक,तरुणी पोहचली होती थेट विकीच्या घरी

मुंबई- अभिनेता विकी कौशल आपल्या अभिनयामुळे बॉलिवूडमध्ये सर्वाधिक चर्चेत असतो.त्याचा सोशल मीडियावरही बराच मोठा चाहतावर्ग आहे. पण त्यातही त्यांच्या महिला चाहत्यांची संख्या सर्वाधिक आहे. विकी कौशलवर जीव ओवाळून टाकणाऱ्या तरुणींची संख्याही काही कमी नाही. विकी कौशलनं कतरिनाशी लग्न केल्यानंतर अनेकांच्या पदरी निराशा पडली. पण काही महिन्यांपूर्वी असं काही झालं होतं की, एक तरुणी थेट त्याच्या घरी पोहोचली होती.

विकी कौशलनं एका मुलाखतीत हा किस्सा शेअर केला आहे. तो म्हणाला, ‘घरी माझे आई-बाबा होते. बेल वाजली तसं माझ्या आईने दरवाजा उघडला. समोर एक मुलगी उभी होती. आईला वाटलं माझी कोणी मैत्रीण असेल जिच्या येण्याबद्दल सांगायला मी विसरलो. पण जेव्हा त्या मुलीनं सांगितलं की तिचं माझ्याशी फेसबुकवर बोलणं झालं आहे आणि मी तिला घरी भेटायला बोलवलं आहे तेव्हा माझ्या आई- वडिलांना धक्का बसला.’

विकी कौशल पुढे म्हणाला, ‘मी फेसबुक वापरत नाही हे माझ्या कुटुंबीयांना माहीत होतं. त्यानंतर त्यांनी त्या मुलीची चौकशी केली. त्यावेळी समजलं की, तिचं माझ्या नावाच्या खोट्या अकाउंटवर कोणाशी बोलणं झालं होतं. जे काही झालं ते खूपच विचित्र होतं.’

हा किस्सा शेअर करत विकीने मुलाखती चांगलीच रंगवली.ही मुलाखत सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत असून आजपर्यंत या मुलाखतीला १० मिलीयन एवढे लाईक्स मिळाले आहेत.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button
error: Content is protected !!