
मुंबई: मुख्यमंत्र्यांच्या विरोधात आक्षेपार्ह वक्तव्याप्रकरणी गुन्हा दाखल झाल्यावर नारायण राणेंचा अटकपूर्व जामीन अर्ज आज रत्नागिरी न्यायलयाने फेटाळला.त्यानंतर अत्यंत नाट्यमय रित्या नारायण राणें यांना पोलिसांनी अटक करून संगमेश्वर. पोलीस स्थानकात नेण्यात आले आहे.
राणे यांचा रक्तदाब व शुगर वाढल्याने त्यांना अस्वस्थ वाटत होते. त्यामुळे अटके अगोदर त्यांची वैद्यकीय चाचणी करण्यात आली होती.
दरम्यान भाजपा ची जनआशीर्वाद यात्रा थांबू नये याकरिता विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांना कोकणाकडे रवाना करण्यात आले आहे. जनआशीर्वाद यात्रा आता प्रवीण दरेकर पुढे चालवतील. मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, रत्नागिरी न्यायालयाने नारायण राणेंचा अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळल्यानंतर मुंबई उच्च न्यायालयात धाव घेतली होती मात्र उच्च न्यायालयाने तातडीने सुनावणी घेण्यास नकार दिल्याचे वृत्त आहे. यामुळेच नारायण राणे यांना अटक करण्यात आली आहे.





