नवी दिल्लीकोंकणब्रेकिंगमंत्रालयविदर्भ
कोकणातील रिफायनरी विदर्भात हलवा- केंद्रीय मंत्री नितीन गडकरी

मुंबई:कोकणातील नाणार येथील प्रस्तावित रिफायनरी वरून गेल्या काही वर्षांपासून सुरु असलेल्या राजकारणाला आता अचानक वेगळे वळण मिळालेले आहे. रिफायनरी समर्थक व विरोधक आक्रमक झाले असताना आता वेगाने घडामोडी होताना दिसत आहेत. रिफायनरी प्रकल्प राज्याबाहेर जाऊ नये असे शिवसेनेचे प्रयत्न आहेत. तसेच ज्या ठिकाणी विरोध नाही त्या ठिकाणी रिफायनरी प्रकल्प होईल, असे शिवसेनेचे म्हणणे आहे. दरम्यान, हा रिफायनरी प्रकल्प आता विदर्भात हलवा असे पत्र केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना लिहिलं आहे.
यापूर्वी १४ फेब्रुवारी रोजी नितीन गडकरी यांनी केंद्रीय पेट्रोलियम मंत्री हरदिपसिंग पुरी यांनादेखील या संदर्भात पत्र लिहिले होते. त्यानंतर आता त्यांनी याबाबतचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र लिहिलं आहे.