मुंबई
मुख्यमंत्री शिंदे यांची चंद्राबाबू नायडू यांनी घेतली सदिच्छा भेट

मुंबई- मुख्यमंत्री एकनाथ संभाजी शिंदे यांची आज आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू यांनी सदिच्छा भेट घेतली. मुख्यमंत्र्यांच्या ‘वर्षा’ या शासकीय निवासस्थानी झालेल्या या भेटीत आंध्रप्रदेश आणि महाराष्ट्र या राज्यांतील परस्पर सहकार्य वाढवून दोन्ही राज्यांच्या विकासावर यावेळी प्रामुख्याने चर्चा करण्यात आली. केंद्रीय मंत्री राममोहन नायडू, राज्याचे सार्वजनिक बांधकाम (सार्वजनिक उपक्रम) मंत्री दादाजी भुसे, खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यावेळी उपस्थित होते.