महाराष्ट्रशैक्षणिक

विविध शैक्षणिक उपक्रमांनी साजरी करा डॉ.बाबासाहेब आंबेडकरांची १३१ वी जयंती-राजू झनके

मुंबई:कोरोनाचे सावट दूर झाल्याने जल्लोषासह विविध शैक्षणिक उपक्रम राबवून संविधान निर्माते डॉ. बाबासाहेब आंबेडकरांची जयंती साजरी करावी असे आवाहन एक वही एक पेन अभियानचे प्रमुख व ज्येष्ठ पत्रकार राजू झनके यांनी केले आहे.

देशात व महाराष्ट्रात मागील दोन वर्षांपासून कोरोनाचा प्रादुर्भाव असल्याने सार्वजनिक उत्सव साजरे करण्यावर बंधने घालण्यात आली होती मात्र आता महाराष्ट्रावरील कोरोनाचे सावट दूर झाल्याने यंदाची डाॅ बाबासाहेब आंबेडकरांची १३१ वी जयंती सर्वत्र जल्लोषात साजरी केली जाणार असून विविध मंडळे जयंती उत्सव समित्यांसह राजकीय पक्षांकडून तयारी सुरू आहे.

मिरवणूका प्रबोधनात्मक कार्यक्रमांसह अनेक कार्यक्रमांची रेलचेल यावेळी असणार आहे. परंतु डॉ.बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्या कृतीतून जनतेला शिक्षणाचे महत्व पटवून दिले असल्याने सदर कार्यक्रमांसोबतच समाजातील होतकरू गुणवंत परंतु गरजू विद्यार्थ्यांना दत्तक घेणे त्यांच्या शिक्षणाचा खर्च उचलणे, युपीएसी,एमपीएससीचे क्लासेस चालविणे, अशा विद्यार्थ्यांच्या पालकांना शिक्षणासाठी आर्थिक मदत देणे ठिक-ठिकाणी अभ्यासिका सुरू करणे ,शैक्षणिक साहित्यांचे वितरण करणे आदी शैक्षणिक उपक्रम राबवून संविधान निर्माते डॉ. बाबासाहेब आंबेडकरांची जयंती ख-या अर्थाने साजरी करावी असे आवाहन एक वही एक पेन अभियानचे प्रमुख व ज्येष्ठ पत्रकार राजू झनके यांनी केले आहे.

अधिक माहितीसाठी ९३७२३४३१०८ या क्रमांकावर संपर्क साधावा असे आवाहन करण्यात आले आहे

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button
error: Content is protected !!