देशविदेश

सावधान! गॅस सिलिंडरवरील हा कोड तपासून घ्या; अन्यथा…

स्वयंपाकाचा गॅस सिलिंडर (एलपीजी गॅस) भारतातील अगदी छोट्या-छोट्या आणि कच्चा घरांपर्यंत जलदगतीने पोहोचला आहे. स्वयंपाकाचा गॅस केवळ घरगुती लोकांसाठी सुविधाजनक नाही, तर आपल्या आसपासच्या वातावरणासाठी खूप उपयुक्त आहे. एकीकडे स्वयंपाकाच्या गॅस आपल्या अनेक समस्या संपवत आहे, तर दुसऱ्या बाजूला या गॅस सिलिंडरच्या धोकादायक परिणामांच्या बातम्याही समोर येत आहेत. स्वयंपाकाच्या गॅस सिलिंडरचा अत्यंत सावधगिरीने वापर करायला हवा. गॅस सिलिंडरच्या वापरासाठी आपल्या अनेक गोष्टींची काळजी घ्यायला हवी. लोकांच्या हलगर्जीपणामुळे अनेकदा दुर्घटना घडतात. गॅस सिलिंडरचा स्फोट होतो, त्यात घराचे नुकसान होतेच तसेच घराला आग लागून अनेक मौल्यवान वस्तूही जळून खाक होतात. काही दुर्घटनांमध्ये जिवीतहानीही घडते. 

सुरक्षा मानके लक्षात ठेवून बनतो स्वयंपाकाचा गॅस सिलिंडर

स्वयंपाकाच्या गॅस सिलिंडरवर सूचीबद्ध असलेल्या कोडबद्दल जाणून घेण्यापूर्वी हे जाणून घेणे गरजेचे आहे की आपल्या घरांमध्ये येणाऱ्या गॅस सिलिंडरची काही प्रकारची टेस्ट केली जाते. या टेस्ट केल्यानंतरच गॅस सिलिंडर डिलीव्हरीसाठी पाठवण्यात येतो. घरांमध्ये वापरल्या जाणाऱ्या एलपीजी गॅस सिलेंडर बीआयएस 3196 मानक समोर ठेवून बनवला जातो. सर्वसाधारणत: कुठल्याही एलपीजी गॅस सिलिंडरची आयुर्मान 15 वर्षांचे असते. आपल्या सर्व्हिसदरम्यान सिलिंडरला आणखी दोन वेळा टेस्टसाठी पाठवले जाते. अशा प्रकारे सिलिंडरची अनेकदा टेस्ट केली जाते. वापरासाठी पाठवण्यापूर्वी सिलिंडरची दोन वेळा टेस्ट केली जातेच. त्याचबरोबर सर्व्हिस दरम्यानसुद्धा दोन वेळा टेस्ट करण्यात येते. सर्व्हिस दरम्यान सिलिंडरचा पहिली टेस्ट 10 वर्षांनंतर होते, त्यानंतर पाच वर्षांनंतर दुसऱ्यांदा टेस्ट केली जाते.

सामान्य प्रेशरच्या तुलनेत 5 पट अधिक प्रेशरने होते सिलिंडरची तपासणी

टेस्टिंगदरम्यान सिलिंडरच्या लिकेजची तपासणी करण्यासाठी पाण्याने भरून हाइड्रो टेस्ट केली जाते. याव्यतिरिक्त प्रेशर टेस्टदेखील केली जाते. एका सिलिंडरवर सामान्य पे्रशरच्या तुलनेत पाच पट अधिक प्रेशर टाकले जाते. ज्या सिलिंडरकडून मानकांची पूर्तता होत नाही, अशा प्रकारचे सिलिंडर नष्ट केले जातात.

सिलिंडरवर लिहिले जातात विशिष्ट कोड

गॅस सिलिंडरला सहज उचलण्यासाठी वॉल्वजवळ 2 ते 3 इंच रुंद पट्ट्या लावल्या जातात. ज्याच्या वरच्या भागात हॅण्डल जोडलेले असते. सिलिंडरच्या पट्ट्यांवरच एक कोड लिहिलेला असतो, त्याची सुरुवात ए, बी, सी आणि डी या शब्दांपासून होते. उदाहरणार्थ- ए 24, बी 25, सी 26, डी 22. येथे ए, बी, सी आणि डी याचा अर्थ महिना असा आहे. ‘ए’चा वापर जानेवारी, फेब्रुवारी आणि मार्च या महिन्यांसाठी केला जातो. तर ‘बी’चा वापर एप्रिल, मे आणि जून या महिन्यांसाठी केला जातो. ‘सी’चा वापर जुलै, ऑगस्ट आणि सप्टेंबर या महिन्यांसाठी केला जात आहे. ‘डी’ वापर आॅक्टोबर, नोव्हेंबर आणि डिसेंबर या महिन्यांसाठी केला जातो. याव्यतिरिक्त दोन अंकांचे नंबर वर्षाचे शेवटचे दोन अंक असतात.

त्यामुळे आपल्या घरातील सिलेंडर तपासून घ्या आणि जर एक्सपायरी दिनांकाच्या बाहेरील असेल तर चुकूनही वापर करू नका,आणी त्वरित गॅस डीलर शी संपर्क साधून धोका टाळा.

 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button
error: Content is protected !!