केवळ तीन रुग्ण आढळले म्हणून चीनने ११ लाख लोकसंख्येचं शहर केलं लॉकडाउन…

चीन- कोरोनाने पुन्हा एकदा डोकंवर काढायला सुरूवात केली असून सर्वात प्रथम या व्हायरसचा सामना करणाऱ्या चीनने पूर्वकाळजी घेण्यास सुरुवात केली आहे. चीनने कोरोनाला रोखण्यासाठी कडक निर्बंध लावण्यावर जोर दिला असून एकही रुग्ण आढळू नये यासाठी प्रयत्न सुरु केले आहेत.
चीनने आपल्या सीमांवरही कडक निर्बंध लावले आहेत. याचमुळे चीनने फक्त तीन रुग्ण आढळले म्हणून जवळपास ११ लाख लोकसंख्येचं शहर लॉकडाउन केलं आहे. या तिन्ही रुग्णांना कोणतीही लक्षणं जाणवत नाहीयेत.मात्र, देशात अनेक ठिकाणी वारंवार रुग्ण आढळत असल्याने चीनवर सध्या दबाव आहेत.
त्यातच विंटर ऑलिम्पिकसाठी फक्त एक महिन्याचा कालावधी उरला आहे.हेनान प्रांतात असणाऱ्या युझोऊ शहरातील सर्व नागरिकांना कोरोनाचा संसर्ग वाढू नये यासाठी सोमवारपासून घराबाहेर न पडण्याची सूचना देण्याच आल्या आहेत. या शहराची लोकसंख्या १० लाख १७ हजार इतकी आहे. गेल्या काही दिवसात तीन रुग्ण आढळल्यानंतर ही घोषणा करण्यात आली.
अश्यात नागरिकांना घराबाहेर न पडण्याची सूचना असून यासंबंधी सोमवारी आदेश देण्यात आला आहे. कोरोनाला प्रतिबंध करण्यासाठी आणि उपायांची काटेकोरपणे अंमलबजावणी करण्यासाठी काही महत्वाच्या सूचनादेखील करण्यात आल्या आहेत.
शहरात आधीच बस आणि टॅक्सी सेवा बंद करण्यात येत असल्याची तसंच शॉपिंग मॉल्स, म्युझियम आणि पर्यटनस्थळं बंद करत असल्याची घोषणा करण्यात आली आहे.