मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांची सर्वपक्षीय नेत्यांबरोबर कोरोना संदर्भात बैठक:आता कडक लॉकडॉऊनला पर्याय नसल्याचे मत
मुंबई,दि.१०:राज्यात रुग्णांची संख्या दिवसेंदिवस मोठ्या प्रमाणावर वाढत असून त्यासाठी आज मुख्यमंत्र्यांनी सर्वपक्षीय नेत्यांची बैठक बोलावली आहे ही बैठक सुरू असून या बैठकीत महाराष्ट्राचे मुख्य सचिव कुंटे यांनी राज्यातील गंभीर परिस्थितीबाबत माहिती दिली मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनीदेखील या बैठकीत निर्णय घेण्याची हीच वेळ असून आता कडक लॉकडॉऊन पर्याय नसल्याचे मत व्यक्त केले आहे अन्यथा परिस्थिती गंभीर होईल असे मत मांडले आहे.
या बैठकीत उपमुख्यमंत्री अजित पवार, मंत्री अशोक चव्हाण, बाळासाहेब थोरात, दिलीप वळसे पाटील, एकनाथ शिंदे, जयंत पाटील, राजेश टोपे, अमित देशमुख, तसेच नाना पटोले, विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस, प्रवीण दरेकर, चंद्रकांतदादा पाटील आदींची उपस्थिती आहे.
बैठकीत विरोधी पक्षाच्यावतीने देवेंद्र फडणवीस काँग्रेसच्या वतीने बाळासाहेब थोरात,अशोक चव्हाण आदींनी मते मांडली आहेत एकूणच महाविकास आघाडीच्या नेत्यानी कडक लॉकडॉऊनच्या शिवसेनेच्या भूमिकेला पाठिंबा दिल्याचे कळत आहे यामुळे सर्व पक्षांच्या नेत्यांची मते ऐकल्यानंतर मुख्यमंत्री आपला निर्णय जाहीर करणार आहेत.