ब्रेकिंग
महागाईचा होणार विस्फोट ! सीएनजी आणि पीएनजीच्या किमतीत भरमसाठ वाढ.. आता जनता गॅसवर…

मुंबई:– सर्वसामान्यांच्या भोवती महागाईचा विळखा घट्ट होत चालला असताना आणखी एक चिंतेची बातमी समोर आली आहे.पाईपद्वारे घरगुती वापरासाठी लागणारा एलपीजी आणि वाहन इंधनासाठी आवश्यक असलेला सीएनजी यांच्या किमतीत पुन्हा एकदा वाढ करण्यात आली असून दोन्ही इंधनाच्या दरात किलोमागे दोन रुपयांची वाढ झाली आहे.हे नवे दर १८ डिसेंबर पासून लागू झाले आहेत.
या नव्या दरात कराचाही समावेश आहे. सीएनजी व्यतिरिक्त एलपीजी पीएनजीच्या दरातही प्रति किलो दोन रुपयांनी वाढ करण्यात आली आहे. हे सर्व पाहता सर्वसामान्यांच्या खिशाला कात्री लागण्याची शक्यता आहे.
आधीच लॉकडाऊन, कोरोना, बेरोजगारी या समस्यांनी त्रस्त असलेल्या सर्वसामान्य जनतेला राज्य सरकार आणि केंद्र सरकार वेळोवेळी एका मागून एक झटके देत आहे.हे दर येत्या काळात आणखी वाढण्याची शक्यता अर्थ तज्ञांनी व्यक्त केली आहे.