मोठी बातमी! राज्यातील महाविदयालये १५ फेब्रुवारीपर्यंत बंद-मंत्री उदय सामंत यांची घोषणा

मुंबई- कोरोनाने गेल्या २ वर्षांपासून संपूर्ण जगात धुमाकुळ घातला आहे.अश्यातच आपल्या राज्यात कोरोना संसर्गाची तिसरी लाट आल्याचे दिसत आहे. दररोज आढळणाऱ्या कोरोनाबाधितांच्या संख्येत मोठी वाढ होत आहे. शिवाय, ओमायक्रॉन बाधित रूग्ण संख्येतही भर पडतच आहे.
राज्यातील महाविदयालये १५ फेब्रुवारी पर्यंत बंद ! मंत्री उदय सामंत यांची घोषणा.. pic.twitter.com/bykhTFZwu8
— [email protected] (@mirrormaharash3) January 5, 2022
याच पार्श्वभूमीवर राज्यातील महाविद्यालये आणि परीक्षांच्या बाबतीत मोठा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. आज राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांनी यासंदर्भात घोषणा केली असून राज्यातील सर्व अकृषी महाविद्यालये आणि तंत्रशिक्षण संस्था १५ फेब्रुवारीपर्यंत बंद राहणार असल्याचं त्यांनी जाहीर केलं आहे. तसेच, सर्व विद्यापीठांनी ऑनलाईन पद्धतीने परीक्षा घेण्याचा निर्णय देखील घेण्यात आल्याचं त्यांनी सांगितलं.
मंगळवारी यासंदर्भात सविस्त बैठक झाल्यानंतर आज उदय सामंत यांनी यासंदर्भातला निर्णय जाहीर केला आहे. ‘सर्व अकृषी विद्यापीठे, अभिमत विद्यापीठे, तंत्रनिकेतन, विद्यापीठांशी संलग्नित महाविद्यालयांमधली परीक्षा ऑनलाईन पद्धतीने घेतली जाणार असल्याचा निर्णय घेण्यात आला आहे. विजेची अनुपलब्धता, नेटवर्क कनेक्टिव्हिटीमुळे, विद्यार्थ्यांच्या कुटुंबात किंवा विद्यार्थी करोनाबाधित असतील तर त्यांचं शैक्षणिक वर्ष वाया जाऊ नये, याची दक्षता सर्व विद्यापीठांनी घेतली पाहिजे. खासगी विद्यापीठांनी देखील याच निर्णयाचं पालन करायला हवं’, असं ते म्हणाले.