महाराष्ट्रमुंबई

देवस्थानच्या मनमानी कारभाराची मुख्यमंत्र्यांकडे तक्रार

मुंबई / रमेश औताडे

भ्रष्टाचार सर्वत्र होत असतो. त्यात देव देऊळही सुटले नाही. अशाच एका देवस्थानाचा मनमानी आर्थिक कारभार उघड करण्यासाठी कवी लेखक सामाजिक कार्यकर्ते अशोकराव टाव्हरे यांनी मुख्यमंत्री व विधी,न्याय खात्याचे मंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे लेखी निवेदनाद्वारे केली आहे.

२० वर्षाच्या श्री यमाई देवस्थानच्या अपहाराच्या वसुलीची कार्यवाही व्हावी यासाठी टाव्हरे यांनी सर्व पुरावे सरकारला सादर केले आहेत. कनेरसर ता.खेड.जि.पुणे येथील आजी- माजी विश्वस्त बरखास्ती ची सह.धर्मादाय आयुक्त पुणे यांनी केली होती. रेकार्ड सादर न करणे,देणगी व निधीचा अपहार या प्रकरणी गेली पाच वर्षे प्रशासक कमिटी काळातील उत्पन्न व शिल्लक गृहीत धरून त्याआधारे आजी- माजी बरखास्त विश्वस्त व त्यांचे वारस यांच्याकडून अपहाराच्या कोट्यावधी रूपयांची वसुली होण्यासाठी संबधितांवर गुन्हे दाखल होण्यासाठी गृह तसेच विधी व न्याय विभागाला सखोल चौकशीचे आदेश देण्यासाठी टाव्हरे यांनी मुख्यमंत्र्यांना निवेदन दिले आहे.

श्री यमाई देवस्थान संस्थेत गैरव्यव्हार झाल्याने व वीस वर्षातील कोणतेही रेकाॅर्ड,दागिने,जडजवाहिर, याचा हिशोब न ठेवल्याने व कोट्यावधींचा अपहार केल्याने आजी- माजी विश्वस्त बरखास्त करून शासकीय प्रशासक कमिटी नेमली जावी अशी मागणी केली होती. त्यांच्या निर्देशानुसार ऑगस्ट २०१९ मध्ये सह.धर्मादाय आयुक्त पुणे यांनी शासनास अहवाल पाठवून त्यांनी त्यांच्याकडे दाखल असलेल्या सुमोटो केस अन्वये सर्व आजी-माजी विश्वस्त बरखास्ती हा आदेश पारित करून २० जानेवारी २०२० रोजी शासकीय कमिटी नियुक्त केली होती असे त्यांनी सांगितले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button
error: Content is protected !!