धक्कादायक: मुख्यमंत्री उद्धव ठाकरे माझ्यावर पाळत ठेवताहेत;काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांचा गंभीर आरोप

मुंबई:मुख्यमंत्री उद्धव ठाकरे माझ्यावर पाळत ठेवत आहेत असा गंभीर आरोप काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केला आहे. गेल्या काही दिवसांपासून आपल्या वादग्रस्त वक्तव्यांमुळे चर्चेत असणारे नाना पटोले यांच्या या वक्तव्यामुळे नवा वाद निर्माण होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
लोणावळ्यात काँग्रेस कार्यकर्त्यांना संबोधित करताना नाना पटोले यांनी हे खळबळजनक वक्तव्य केलं आहे. सत्तेत सोबत असले तरी मुख्यमंत्रीपद, त्यांच्याकडे आहे असं सांगताना नाना पटोले यांनी मला सुखाने जगू देणार नाहीत असंही म्हटलं आहे.सोनिया गांधींनी महाराष्ट्र काँग्रेसची भूमी असल्याचं सांगितलं आहे.आपल्याला सत्ता आणायची आहे. मी त्यांना आश्वासन देऊन आलो आहे”, असं नाना पटोले यावेळी म्हणाले. “महाराष्ट्रात काँग्रेसची सत्ता आणायचा मानस मी केला आहे. कोणीही घाबरण्याचं कारण नाही,असेही ते म्हणाले





