कृषीवार्ताकोंकण

सिंधुदुर्गात उच्चांकी भात खरेदीबाबत कृषीमंत्री दादाजी भुसे यांनी आ.वैभव नाईक यांचे केले कौतुक

कृषीमंत्री भुसे यांनी कुडाळ येथील बांबू प्रक्रिया केंद्र, बजाज राईस मिल ला दिली भेट

सिंधुदुर्ग,दि.८: राज्याचे कृषीमंत्री दादाजी भुसे आज जिल्हा दौऱ्यावर आले असता  कुडाळ एमआयडीसी येथील कॉनबॅकच्या मुख्य कार्यालयास भेट देऊन सिंधुदुर्ग जिल्ह्यातील बांबू लागवड पध्दतीची व मर्यादांची माहिती घेतली. कॉनबॅकच्या बांबू प्रक्रिया व डिझाईन स्टुडियोला भेट दिली. तसेच बांबू हस्तकला निर्मिती केंद्र व प्रदर्शन केंद्रास भेट देऊन कामाची माहीती घेतली.

सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कृषी क्षेत्रात काम करणाऱ्या प्रगतशिल शेतकऱ्यांच्या रिसोर्स बँक या योजनेतील शेतकऱ्यांसोबत संवाद साधला. त्याचबरोबर कुडाळ एमआयडीसी येथील बजाज राईस मिल येथे भेट देऊन भात खरेदीचा आढावा घेतला.आमदार वैभव नाईक यांच्या प्रयत्नांमुळे सिंधुदुर्ग जिल्ह्यात ८२ हजार २५९ क्विंटल इतकी उच्चांकी भात खरेदी झाली याबद्दल ना. दादाजी भुसे यांनी आ. वैभव नाईक यांच्या कार्याचे कौतुक करत गौरवोद्गार काढले.

यावेळी कुडाळ मालवणचे आमदार वैभव नाईक,शिवसेना जिल्हाप्रमुख संजय पडते, सिंधुदुर्ग जिल्हा बँकेचे अध्यक्ष सतीश सावंत, जिल्हा परिषद गटनेते नागेंद्र परब, उपजिल्हाप्रमुख अमरसेन सावंत, कुडाळ तालुका प्रमुख राजन नाईक,तालुका संघटक बबन बोभाटे, विकास कुडाळकर, संतोष शिरसाट, तुळशीदास पिंगुळकर आदीसह शिवसेना पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते.

ना. दादाजी भुसे यांनी कॉनबॅकच्या मुख्य कार्यालयात भेट देऊन बांबूच्या सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या लागवड पध्दतीची विशेषतः व मर्यादांची सविस्तर माहिती घेतली. बांबूच्या संशोधन केंद्रावर कॉनबॅकचे संचालक मोहन होडावडेकर यांनी त्यांचे स्वागत करुन प्रास्ताविक केले. मिलिंद पाटील यांनी बांबू लागवडीच्या सद्यस्थितीचे सादरीकरण केले. या चर्चेमध्ये जिल्ह्यातील प्रगतशील बांबू लागवडदार शेतकरी दादा बेळणेकर, प्रभाकर परब, अनिल सावंत, बाजीराव झेंडे, डीयागो डीसोजा, मिलिंद पाटील यांनी सहभाग घेतला. यावेळी त्यांनी कॉनबॅकच्या बांबू प्रक्रिया व डिझाईन स्टुडियोला भेट दिली. तसेच बांबू हस्तकला निर्मिती केंद्र व प्रदर्शन केंद्रास भेट देऊन कामाची माहीती घेतली.

सिंधुदुर्ग जिल्ह्यातील बांबूच्या उपलब्धतेचे सर्वेक्षण करण्यात यावे, सिंधुदुर्ग जिल्ह्यातील “माणगा” बांबूवर संशोधन करुन खात्रीशीर रोपांची निर्मिती करण्यात यावी, इतर कोकणच्या वातावरणाला पुरक ठरणाऱ्या इतर जातीच्या बांबूची सरसकट लागवड करण्यापूर्वी प्रगतशिल शेतकऱ्या मार्फत त्याचे प्रदर्शनी क्षेत्र विकसित करुन त्याचे परिणाम अभ्यासून त्यानंतरच सामान्य शेतकऱ्याना लागवडीबाबत मार्गदर्शन करण्यात यावे. सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये निळेली येथे कोकण कृषी विद्यापीठामार्फत बांबू संशोधन केंद्र उभारण्यात यावे. आदी मागण्या यावेळी कृषीमंत्र्यासमोर ठेवण्यात आल्या.

कृषी मंत्र्यांनी सविस्तर चर्चेत सकारात्मक प्रतिसाद देताना कॉनबॅकच्या १७ वर्षाच्या बांबू संशोधन व विकासाच्या कार्याची वाखाणणी केली. त्याचबरोबर बांबू विषयामध्ये सर्वकष सर्वसमावेशक अभ्यासाकरीता , प्रक्रिया,व बाजारपेठेकरीता स्थानिक आमदार वैभव नाईक यांच्या उपस्थितीत कृषी विद्यापीठ, कृषी खाते, कॉनबॅक व स्थानिक प्रगतशिल शेतकरी यांच्या उपस्थितीत स्वतंत्र बैठकीचे आयोजन करुन या विषयाचा परिप्रेक्ष आराखडा तयार करुन हा कार्यक्रम अधिक व्यापक पद्धतीने राबविण्याचे सुतोवाच श्री. भुसे यांनी केले.
त्याचप्रमाणे सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कृषी क्षेत्रात काम करणाऱ्या प्रगतशिल शेतकऱ्यांच्या रिसोर्स बँक या योजनेतील शेतकऱ्यांसोबत त्यांनी संवाद साधला. या सर्व शेतकऱ्यांना उद्देशुन बोलताना त्यांनी खरीब हंगामाचा आराखडा बनविण्याच्या कामी आढावा म्हणुन मते जाणुन घेतली. तसेच कोणत्याही परिस्थितीत यावर्षीच्या खरीब हंगामात खतांचा पुरवठा कमी पडणार नाही याची ग्वाही दिली. स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे उन्नती अभियानामार्फत जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी कृषी प्रक्रिया उद्योगांचा लाभ घ्यावा त्याचबरोबर सर्व कृषी योजनामध्ये ३०% महिला शेतकऱ्यांसाठी राखीव ठेवण्यात आले असून महीला शेतकऱ्यांनी त्याचा लाभ घेण्यासाठी पुढे यावे असे आवाहन त्यांनी केले. या भेटीच्यावेळी विभागीय कृषी अधिकारी, जिल्हा कृषी अधिकारी व कृषी खात्याचे संबंधीत कर्मचारी उपस्थित होते. त्याचप्रमाणे चिवारचे संचालक मिलिंद ठाकुर, मॉड्युलर फर्निचर क्लस्टरचे संचालक प्रशांत काराणे, मदन सामंत, सखी पवार, तेजस नाईक, श्रीहरी बत्तलवार, मिलिंद आरोंदेकर आदी मान्यवर उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button
error: Content is protected !!