कोरोना रूग्णसंख्या मुंबईत स्थिर , तर पुण्यासह राज्यात वाढ..

मुंबई- राज्यात कोरोना रूग्णसंख्येत गेल्या तीन दिवसापासून सातत्याने दिलासादायक घट पाहायला मिळाल्यानंतर आज यात काहीशी वाढ झाली आहे. गेल्या २४ तासात राज्यात कोरोनाच्या ३९ हजार २०७ नव्या रुग्णांची नोंद झाली असून ५३ जणांचा मृत्यू झाला आहे. तर राज्यात गेल्या २४ तासात ३८,८२४ रुग्ण कोरोनामुक्त होऊन घरी परतले आहेत. या आधी रुग्णसंख्या ४० हजारांच्या वर असायची,मात्र आज त्यात घट झाल्याचं पाहायला मिळत आहे.
अश्यात आज राज्यात एकाही ओमायक्रॉनबाधित रुग्णांची नोंद झालेली नाही. आतापर्यंत १८६० ओमायक्रॉनबाधितांची नोंद राज्यात झाली आहे. त्यापैकी १००१ रुग्ण ओमायक्रॉनमुक्त झाले आहे. तर सध्या पश्चिम महाराष्ट्रात कोरोना रूग्णसंख्या म्हणावी तशी कमी झालेली नाही. पुणे विभागात (पुणे,सोलापूर,सातारा,सांगली) या जिल्ह्यात १३२७५ रूग्ण संख्या आढळली आहे.
मुंबईतील कोरोना परिस्थिती
मुंबईच्या कोरोना रूग्णसंख्येत कालच्या तुलनेत आज किंचितशी वाढ झाली आहे. आज दिवसभरात मुंबईत ६ हजार १४९ नवे रुग्ण आढळले आहेत.तर ७ जणांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे.
ज्यामुळे कोरोनामुळे मृत्यू पावलेल्यांची संख्या १६ हजार ४७६ झाली आहे. तर नव्या बाधितांच्या तुलनेत जवळपास दुप्पट रुग्ण म्हणजेच १२ हजार ८१० जणांनी कोरोनावर मात केली आहे. सध्या मुंबईचा रिकव्हरी रेट वाढून ९४ टक्के इतका आहे.