ब्रेकिंग
दिलासादायक: मुंबईत व राज्यात कोरोना रुग्णसंख्या झपाट्याने घटतेय..
मुंबई, दि.४: मुंबईत कोरोना ची रुग्णसंख्या दिवसेंदिवस घटत आहे, ही मुंबईकरांसाठी आनंदाची बाब आहे. काल मुंबईत तब्बल १००० रुग्णसंख्येची घट झाली. काल ३,६७२ रुग्ण आढळले होते, तर आज २,६६२ रुग्ण आढळले.त्याच बरोबर दुप्पट संख्येने रुग्ण बरे झाले. आज ५,७४६ रुग्ण बरे झाले. आढळणाऱ्या रुग्णसंख्येपेक्षा बरे होणाऱ्यांची संख्या अधिक ही दिलासादायक बाब आहे.
मुंबईत कोरोना बाधितांची एकूण संख्या ६,५८,८६६ झाली, तर बरे झालेल्यांची एकूण संख्या ५,८९,६१९ झाली.
मुंबईत आज मृतांची संख्या ७८ झाली, तर मृतांची एकूण संख्या १३,४०८ झाली.
मुंबईत सध्या ५४,१४३ सक्रिय रुग्ण विविध रुग्णालयात उपचार घेत आहेत.