ब्रेकिंग
दिलासादायक ! राज्यात रुग्णसंख्या उतरणीला, वाचा रुग्णसंख्या

मुंबई :- गेल्या २४ तासात राज्यात कोरोनाच्या ५ हजार ४५५ नव्या रुग्ण आढळले आहेत. कालच्या तुलनेत आज रुग्णसंख्या ७९३ ने कमी झाली असून ६३ जणांचा मृत्यू झाला आहे. राज्यात गेल्या २४ तासात १४ हजार ६३५ रुग्ण कोरोनामुक्त होऊन घरी परतले आहेत.
राज्यात आज ७६ ओमायक्रॉनबाधित रुग्णांची नोंद झाली आहे.आतापर्यंत ३५३१ ओमायक्रॉनबाधितांची नोंद राज्यात झाली आहे. त्यापैकी २३५३ रुग्ण ओमायक्रॉनमुक्त झाले आहे. सध्या राज्यात ११७८ ओमायक्रॉनचे रुग्ण अॅक्टिव्ह आहेत.
मुंबईमधील कोरोना परिस्थिती
मुंबईत आज ३६७ नवे कोरोनाबाधित आढळले आहेत, कालच्या तुलनेत ही रुग्णसंख्या आणखी कमी असल्याने मुंबईकरांसह पालिका प्रशासनाला दिलासा मिळाला आहे. गुरुवारी मुंबईत ४२९ रुग्ण आढळले होते. त्यामुळे मुंबईतील रिकव्हरी रेट ९८ टक्के इतका झाला आहे.