देशविदेशब्रेकिंग

चीन मध्ये कोरोना ने वाढवले टेन्शन !

पुन्हा एकदा करोनाचा आऊटब्रेक..

बीजिंग (वृत्तसंस्था) : भारतात एकीकडे १०० कोटींच्या लसीकरणाचा मोठा टप्पा पार केला असताना दुसरीकडे चीनने मात्र पुन्हा एकदा जगाची चिंता वाढवली आहे. चीनमध्ये पुन्हा एकदा करोनाने शिरकाव केला असून दिवसेंदिवस रुग्णसंख्या वाढत आहे.यामुळे चीनने कडक पावलं उचलण्यास सुरुवात केली आहे. चीनने अनेक विमानांचं उड्डाण रद्द केलं असून काही ठिकाणी शाळादेखील बंद करण्यात आल्या आहेत. अनेक ठिकाणी लॉकडाउनही लावण्यात आला आहे. एएफपीने यासंदर्भात वृत्त दिल आहे.

चीनमध्ये पुन्हा एकदा कोरोनाचा शिरकाव झाल्याने जगाच्या चिंतेत भर पडली आहे. कोरोनाच्या रूग्ण संख्येत भर पडल्यामुळे येथील निर्बंध कठोर करण्यात आले आहेत. चीनने अनेक विमानांची उड्डाणे रद्द केली असून काही ठिकाणी शाळादेखील बंद करण्यात आल्या आहेत. अनेक ठिकाणी लॉकडाउनही लावण्यात आला आहे.
चीनमध्ये वेगाने करोनाचा फैलाव होत असल्यामुळे बाहेरील प्रवाशांना यासाठी जबाबदार धरले जात आहे. प्रशासनाकडून कोरोना चाचण्यांचे प्रमाणही वाढवण्यात आले आहे. येथील अनेक पर्यटनस्थळे बंद करण्यात आली आहेत. महत्त्वाचे काम नसेल तर घराबाहेर पडू नका असे आवाहन प्रशासनाने केले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button
error: Content is protected !!