महाराष्ट्र

महाराष्ट्रात आज ९,८१२ कोरोना रुग्ण आढळले, १५६ रुग्णांचा मृत्यू!

मुंबई l आता कोरोनाची दुसरी लाट ओसरत आहे. मात्र, कोरोनाच्या डेल्टा प्लस या नव्या व्हेरिएंटचं आव्हान आता हळूहळू राज्यातील आणि देशातील आरोग्य यंत्रणांसमोर उभं राहू लागलं आहे. डेल्टा प्लस चे राज्यात सर्वाधिक रूग्ण आहेत. त्याचा सामना करण्यासाठी राज्य सरकारने उपाय योजना सुरु केल्या आहेत.

दरम्यान, राज्यात कोरोनाच्या रोजच्या आकडेवारीमध्ये सातत्याने चढ-उतार दिसून येत आहेत. शुक्रवारी १५६ रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यू झाला होता. तर आज (शनिवार) १७९ रुग्णांचा मृत्यू झाला आहे.

राज्यात आज दिवसभरात ८ हजार ७५२ रुग्णांनी कोरोनावर मात केली. त्यामुळे आजपर्यंत महाराष्ट्रात बरे झालेल्या रुग्णांचा आकडा ५७ लाख ८१ हजार ५५१ इतका झाला आहे. या पार्श्वभूमीवर राज्याचा रिकव्हरी रेट अर्थात रुग्ण बरे होण्याचं प्रमाण हे एकूण कोरोनाबाधितांच्या संख्येपैकी ९५.९३ टक्के इतके झाले आहे. ही आरोग्य यंत्रणांसाठी आणि राज्य सरकारसाठी देखील दिलासादायक बाब ठरली आहे.

आज राज्यात ९,८१२ नवीन कोरोना रुग्णांची नोंद झाली आहे तर ८,७५२ रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. त्यामुळे बरे होणाऱ्यांची संख्या आता ५७,८१,५५१ झाली आहे. तसेच राज्यात आज १७९ रुग्णांचा करोनामुळे मृत्यू झाला आहे. सध्या राज्यातील मृत्यूदर २.० टक्के आहे.

आतापर्यंत तपासण्यात आलेल्या ४,०८,३१,३३२ नमुन्यांपैकी ६०,२६,८४७ नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. सध्या राज्यात ६,२८,२९९ रुग्ण घरी उपचार घेत आहेत. तर ४,२७२ रुग्ण संस्थात्मक क्कारंटाईन आहेत.

लसीकरणात सातत्य टिकवत महाराष्ट्र देशात अग्रस्थानी आहे. राज्यात शनिवारी ७ लाख ०२ हजार ४३२ जणांचे लसीकरण झाले. हा आतापर्यंतचा विक्रमी आकडा आहे. आतापर्यत राज्यात ३,०९,७९,४६९ जणांना लस देण्यात आली आहे. अतिरिक्त मुख्य सचिव (आरोग्य) डॉ प्रदीप व्यास यांनी ही माहिती दिली आहे.

  

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button
error: Content is protected !!