कोरोनाचे नवनवे अवतार येणे सुरूच: ‘या’ देशात सापडला कोरोनाचा नवा ‘डेल्टाक्रॉन व्हेरियंट’

सायप्रस – ओमायक्रॉनने जगाची डोकेदुखी वाढवली असतानाच त्यात आता कोरोनाचा आणखी एक नवा व्हेरियंट आढळून आला आहे. त्यामुळे चिंतेत आणखी भर पडली आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, सायप्रस देशामध्ये डेल्टा आणि ओमायक्रॉन प्रकारांचा मिश्र प्रकार आढळून आला आहे.
शास्त्रज्ञांनी ओमायक्रॉन व्हेरिएंट आणि डेल्टा पासून तयार झालेला कोरोनाचा नवीन प्रकार शोधला आहे. सायप्रसच्या एका संशोधकाने कोविड-१९, ‘डेल्टाक्रॉन’ या कोरोनाच्या नवीन प्रकाराचा शोध लावला आहे. जो ओमायक्रॉन व्हेरियंट आणि डेल्टा व्हेरियंटचे संमिश्र स्वरुप असल्याचा दावा केला जात आहे.
सायप्रस विद्यापीठातील जीवशास्त्राचे प्राध्यापक आणि आण्विक विषाणूशास्त्राच्या प्रयोगशाळेचे प्रमुख लिओनडिओस कोस्ट्रिकिस यांच्या मते, डेल्टा आणि ओमायक्रॉन यांचे संमिश्रण असलेला एक नवा व्हेरियंट ‘डेल्टाक्रॉन’ सायप्रसमध्ये आढळून आला आहे.