मुंबई पुन्हा पूर्वपदावर येणार,फेब्रुवारी अखेरपर्यंत शंभर टक्के अनलॉक होणार? पालिका अधिकाऱ्यांनी दिले संकेत

मुंबई:- गेल्या दोन वर्षांपासून सातत्याने कोरोनामुळे आपल्या सर्वांवर या ना त्या कारणाने निर्बंध आले आहेत.कोरोनामुळे महाराष्ट्रात दोनदा लॉकडाऊन देखील लागला आहे. त्यानंतर तिसऱ्या लाटेच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रात बरेच निर्बंध नव्याने लावण्यात आले होते.
मात्र, आता हळू-हळू कोरोना रुग्णसंख्या उतरणीला लागली आहे.मुंबईतील कोरोना रुग्णसंख्या आटोक्यात आली आहे.ही परिस्थिती पाहता मुंबई आता फेब्रुवारी अखेरपर्यंत शंभर टक्के अनलॉक होणार आहे,असे संकेत स्वतः मुंबई महानगरपालिकेचे अतिरिक्त महापालिका आयुक्त सुरेश काकाणी यांनी दिले आहेत.
राज्यासह मुंबईत आता हळूहळू रुग्ण संख्या कमी होऊ लागली आहे.मागील दोन आठवड्यांपासून मुंबईतली रुग्ण संख्या आटोक्यात आली आहे. हे सर्व पाहता फेब्रुवारी अखेरीस मुंबई १००% निर्बंधमुक्त करण्याच्या हालचाली देखील सुरू झाल्या आहेत.त्यामुळे आता लवकरच मुंबईतील नाट्यगृह,सिनेमागृह,उद्याने,मैदाने यांसह अन्य आस्थापने निर्बंधमुक्त होऊन १००% क्षमतेने सुरु करण्यास परवानगी मिळणार आहे. आज ही बातमी मुंबईकरांना दिलासा देणारी आहे.