नरेंद्र मोदींनी सैनिकांचा गणवेश घातला म्हणून न्यायालयाने बजावली पंतप्रधान कार्यालयाला नोटीस

प्रयागराज:- पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गेल्यावर्षी कश्मीर मधील सैनिकांना भेट देताना भारतीय लष्कर गणवेश परिधान केला होता. या गणवेशावरून प्रयागराज येथील जिल्हा न्यायालयाने पंतप्रधान कार्यालयाला नोटीस बजावली आहे. प्रयागराज येथील एका वकीलाने दाखल केलेल्या याचिकेवर सुनावणी देताना न्यायालयाने पंतप्रधान कार्यालयाला ही नोटीस बजावली आहे.
गेल्या वर्षी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी कश्मीरमधील नौशेरा सेक्टरमध्ये कार्यरत असलेल्या जवानांची दिवाळी निमित्त भेट घेतली होती.यावेळी त्यांनी परिधान केलेल्या भारतीय लष्कराच्या गणवेशावरून फौजदारी प्रक्रिया संहितेच्या कलम १५६(३) अंतर्गत प्रयागराज येथील एका वकिलाने न्यायालयात याचिका दाखल केली होती.
याच याचिकेवर सुनावणी देत कोर्टाने गणवेशासंदर्भात पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या पंतप्रधान कार्यालयाला नोटीस पाठवली आहे.याचिकाकर्त्यां वकिलांच्या मते भारतीय लष्करा व्यतिरिक्त इतर व्यक्तीने हा गणवेश परिधान करणे हा भारतीय दंडसंहिता कलम १०४ अंतर्गत गुन्हा आहे.