ब्रेकिंग
मालमत्तेसाठी आईचा छळ करणाऱ्याला न्यायालयाचा दणका, मुलगा आणि सुनेला घर सोडण्याचे आदेश

नवी दिल्ली : दिल्ली उच्च न्यायालयाने एका वृद्घ महिलेला तिचा अधिकार मिळवून दिला आहे. मुलगा आणि सूनेच्या जाचाला कंटाळून वृद्ध महिलेने न्यायालयात धाव घेतली होती. मात्र,यावर निकाल देत न्यायालयाने आईसोबत गैरवर्तन केल्याचा आरोप असलेल्या मुलाला घर सोडण्याचे आदेश दिले आहेत.
महिलेची मालमत्ता रिकामी करण्यासाठी मुलगा आणि सुनेला दिल्ली उच्च न्यायालयाने तीन आठवड्यांची मुदत दिली आहे. जिल्हाधिकाऱ्यांनी मालमत्ता रिकामी करण्याच्या आदेशाविरोधात मुलगा आणि सुनेने दाखल केलेली याचिका फेटाळून लावताना उच्च न्यायालयाने हे आदेश दिले आहेत.
दरम्यान याचिकाकर्त्याच्या मुलांची परीक्षा सुरू असल्याने न्यायालयाने १५ फेब्रुवारीपर्यंत त्यांना घरात राहण्याचे आणि १५ फेब्रुवारीनंतर घर सोडण्याचे आदेश त्यांना दिले आहेत.