ब्रेकिंग
भय्यू महाराजांच्या आत्महत्येप्रकरणी न्यायालयाचा मोठा निर्णय, सेवकासह तिघांना ठरवलं दोषी

भय्यू महाराजांच्या आत्महत्येप्रकरणी न्यायालयाने मोठा निर्णय दिला आहे. आत्महत्येला प्रवृत्त केल्याप्रकरणी इंदोर न्यायालयाने आरोपी सेवक, चालक आणि केअर टेकरला दोषी ठरवलं आहे. त्यांच्यावर आत्महत्येला प्रवृत्त केल्याचा ठपका ठेवण्यात आला आहे.
भय्यू महाराज यांनी २०१८ मध्ये स्वतःच्या सर्व्हिस रिव्हॉल्व्हरमधून गोळी झाडत आत्महत्या केली होती.त्यानंतर महाराष्ट्रासह देशभरात खळबळ उडाली होती.
दरम्यान यानंतर या प्रकरणी काही वर्षांपासून न्यायालयात केस सुरू होती.आज अखेर इंदोर न्यायालयाने भय्यूजी महाराज आत्महत्येप्रकरणी तिन्ही आरोपींना दोषी ठरवत प्रत्येकी ६ वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा सुनावली आहे. त्यांना भारतीय दंड संहिता कलम ३०६ नुसार दोषी ठरवण्यात आलं आहे.