या सवयी हाडांसाठी ठरू शकतात घातक;वाचा सविस्तर

आपले शरीर सुदृढ असं प्रत्येकाला वाटत असतं. यासाठी अनेक जण व्यायामही करतात. मात्र माणसांना लागलेल्या सवयी त्यांच्या शरीरावर वाईट परिणाम करतात. याच सवयीमुळे आपल्याला अनेक आजारांना सामोरे जावे लागत. यात गुडघेदुखी,कंबरदुखी,पाठदुखी यांसारखे दुखणे आपोआपच येतात.
या सर्वांवर वेळीच उपाय झाला नाही. तर या सवयी आपल्याला घातक ठरू शकतात.यांमुळे आपली हाडं ठिसूळ होऊ शकतात. चला तर मग आज जाणून घेऊया या सवयीबाबत.
१. उभे राहून पाणी पिणे:-
उभे राहून पाणी ही सवय आपल्यासाठी घातक ठरू शकते.आपल्या आजूबाजूला सर्रासपणे लोक उभे राहून पाणी पिताना दिसतात.परंतु तज्ञांच्या मते,जे लोक अनेकदा उभे राहून पाणी पितात. त्यांना हाडे दुखणे व अशक्तपणाची तक्रार होऊ लागते. त्यामुळे बसून पाणी पिणे हे आपल्यासाठी लाभदायी ठरू शकतं.
२. मिठाचा जास्त वापर:-
दैनंदिन आहारात मिठाचा जास्त वापर झाला तरी याचा फटका आपला आरोग्यालाही बसू शकतो. मीठामुळे अन्नाची चव वाढते, पण जास्त प्रमाणात खाल्ल्याने हाडेही कमकुवत होऊ लागतात. त्यासोबतच कॅल्शियमची कमतरता देखील आपल्याला जाणवू लागते.त्यामुळे मिठावर नियंत्रण ठेवणे केव्हाही फायद्याचेच.
३. जंक फूड खाणे-
रोजच्या धावपळीच्या जीवनात आपल्याला जंक फूड खाण्याची सवय लागते. यातील बरेचसे पदार्थ हे तेलकट असतात. यामुळे आपल्याला पुरेसे जीवनसत्व मिळत नाहीत आणि यातूनच आपल्या हाडांना योग्य आहार पोचत नाही. त्यामुळेही बऱ्याचदा हाडे कमकुवत होण्याची शक्यता आहे. त्यामुळे आहारात समतोल राखावा.
वरील सवयी बदलल्यास आपण योग्य पद्धतीने आपल्या आरोग्याची काळजी घेऊ शकतो.