महाराष्ट्रमुंबई

जगभरात तुतरीचा आवाज घुमवणारे आंतरराष्ट्रीय तुतारी वादक पांडुरंग गुरव यांनी रचला तुतारी वर पोवाडा

मुंबई / रमेश औताडे

‘ एक तुतारी द्या मज आणुनी…. फुंकिन जी मी स्वप्राणाने… भेदून टाकीन सगळी गगणे….दीर्घ तिच्या त्या किंकाळीने….अशी तुतारी द्या मज आणुनी. ही कविवर्य केशवसुतांची कविता ऐकली की प्रत्येकाला आयुष्यात एकदा तरी तुतारी वाजवण्याचा मोह निर्माण होतो.

अशा या तुतरीचा स्वर अमेरिका , मॉरिशस ,जपान , दुबई या व इतर देशात पोहचवला ते सांगली जिल्ह्यातील वाटेगावचे पांडुरंग शंकर गुरव आज महाराष्ट्रात अनेक महाविद्यालयात विविध सण समारंभ मध्ये पुरातन काळापासून चालत आलेली तुतारी ची कला जिवंत राहावी म्हणून जनजागृती करत आहेत. आंतरराष्ट्रिय स्तरावरील तुतारी वादक पांडुरंग गुरव यांनी आता तुतरिवर पोवाडा रचला आहे.

सांताक्रुज येथील पाठक गाला महाविद्यालयात २०१५ पासून गुरव हे विद्यार्थ्यांना तुतरीची कला शिकवत आहेत. प्रत्येक वर्षी ३० ते ४० मुलांची तुकडी ही तुतारी कला शिकत असतात . महाविद्यालयाच्या प्राचार्य डॉ.मिता पठाडे, प्राध्यापक नेत्रा ठाकरे, प्रशांत कोकणे , दादासो म्हस्के हे सर्व या कलेमध्ये मध्ये जीव ओतून ही कला जपण्यासाठी प्रयत्न करत आहेत.गुरव यांच्या मार्गदर्शन व विद्यार्थ्यांची आवड पाहता इतर महाविद्यालयात तुतारी नक्कीच घुमणार आहे.

वयाच्या ११ व्या वर्षापासुन पांडुरंग गुरव तुतारी वाजवत तर आहेतच सोबत ते लेझीम , शंख , दांडपट्टा , तलवारबाजी या कला ही जोपासत आहेत. लहान वयात वडिलांकडून ही कला शिकत असताना मंदिर , पालखी आदी ठिकाणी ही कला सादर करत करत आज अमेरिका , मॉरिशस, जपान , दुबई या देशात त्यांना आमंत्रण येऊ लागली. महाराष्ट्र शासनाच्या वतीने त्यांनी हे जगाचे दौरे केले आहेत.

परदेशातील राष्ट्राध्यक्ष , मंत्री , राज्यपाल यांनी गुरव यांचा सन्मान केला आहे. सन्मान करत असताना गुरव यांच्या डोळ्यातून आनंद अश्रू वाहत होते .एका खेडेगावातील मुलगा कलेची परंपरा जपत महाराष्ट्राचे हे वाद्य जगभरात पोहचवत आहे. भगवान शंकर यांचे शिष्य तुंगी यांनी बैलाच्या शिंगा पासून बनविलेले हे वाद्य सर्व प्रथम वाजवले गेले होते. शिंगापासून बनले असल्यामुळे त्याला शिंग असे नाव पडले.

चला हवा येऊद्या , झी युवा , इंटरनॅशनल वर्ड ट्रेंड फेस्टिवल , नेव्ही प्रोग्राम या ठिकाणी झालेल्या कार्यक्रमात गुरव यांची तुतारी घुमली तेव्हा प्रेक्षक खूप वेळ टाळ्यांचा गजर करत होते. मर्द मराठे मावळे रणांगणात तुतारी वाजले की मनगटात सर्व शक्ती एकत्र करून शत्रूवर वार करताना मावळ्यांना एक जोश यायचा. विविध राज्यात या शिंगाला विविध नावे आहेत. तुरी ,निपुडी आदी नावाने तुतारी ओळखली जाते.

तुतारी व शंख वाजविल्याने हार्ट अटॅक येत नाही. फुफ्फुसे निरोगी राहतात असे डॉक्टर सांगतात. अनेक महाविद्यालयात विद्यार्थी याचा अनुभव घेत आहेत. अशी ही तुतारी आरोग्यदायी आहे. तिला जतन करण्यासाठी सर्वांनी सहकार्य करण्याची गरज आहे.

मी जिवंत असेपर्यंत ही कला जगभर सर्व देशात पोहोचवणार आहे. सरकारने या कलेला लोककला दर्जा द्यावा अशी मागणी गुरव करत आहेत. लोककला दर्जा तुतारीला मिळाला तर ही कला फार झपाट्याने जगभर पोहचू शकते. आज जगभरात महाराष्ट्र राज्यात मोठ्या प्रमाणात तुतारी वादक आहेत. आंतरराष्ट्रीय स्तरावर फक्त मी एकटा वादक आहे. माझा यात मोठेपणा असून आंतरराष्ट्रीय तुतारी वादक अजून मोठ्या संख्येने घडविण्यासाठी मी प्रयत्न करत आहे. असे पांडुरंग शंकर गुरव यांनी सांगितले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button
error: Content is protected !!