देशविदेश

या 5 प्रकारच्या लोकांना आहे कोरोना च्या ‘डेल्टा व्हॅरिएंट’चा जास्त धोका!

व्हायरसपासून वाचण्यासाठी करा ही 8 कामे

मुंबई: देशात तिस-या लाटेची शक्यता वर्तवली जात आहे. विशेष म्हणजे डेल्टा व्हॅरिएंटचा धोका सर्वात जास्त आहे. डेल्टा प्लस व्हेरिएंटला एक्सपर्ट जास्त घातक मानत आहेत. कोणत्या पाच लोकांना डेल्टा व्हेरिएंटचा जास्त धोका आहे आणि त्यापासून बचाव करण्यासाठी ही कामे करावीत. जाणून घेवूयात पुढील प्रमाणे.

डेल्टा व्हेरिएंटची हीआहेत लक्षणे

काही लक्षणात खोकला, अतिसार, ताप, डोकेदुखी, त्वचेवर लाल चट्टे, बोटे आणि पायाच्या बोटांचा रंग बदलेणे, छातीत वेदना, श्र्वास घेण्याचा त्रास यांचा समावेश आहे.

तज्ज्ञांनुसार डेल्टा प्लससाठी जबाबदार लक्षणे- पोटात वेदना, मळमळ आणि भूक कमी होणे.

जास्त धोक कुणाला आहे…

<< एका संशोधनात 50 पेक्षा जास्त वय असलेले आणि लस न घेतलेले लोक जास्त प्रमाणात संक्रमित आढळले आहेत.

<<पब्लिक हेल्थ इंग्लंडने दावा केला आहे की, कमी वयाचे लोक लस न घेतलेले आणि आंशिक लसीकरण केलेल्या व्यक्तिंना संसर्गाचा जास्त धोका आहे.

डेल्टा प्लसपासून बचाव असा करावा…

>>कोरोनाच्या तिस-या लाटेपासून वाचवण्यासाठी आपले हात नियमितपणे साबणाने धुवत राहा.

>>घरातून बाहेर पडू नका,बाहेर पडताना मास्क लावा आणि सॅनिटायझर सोबत ठेवा.

>>संक्रमित लोक आणि इतर लोकांपासून कमीत कमी एक मीटरचे अंतर ठेवा.

>>शिंकताना किंवा खोकताना तोंड रुमाल किंवा टिश्यू पेपरने कव्हर करा.

>> आजारी असाल तर घराच्या बाहेर पडू नका.

>>धुम्रपान टाळावी. फुप्फुसांना प्रभावित करणा-या वस्तूंपासून दूर राहा.

>> विनाकारण घरा बाहेर पडू नये.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button
error: Content is protected !!