गोरेगाव मिररमंत्रालयमहाराष्ट्रमुंबई
उप मुख्यमंत्री अजित दादा पवार यांचे हस्ते ‘गोरेगाव मिरर’ च्या दिवाळी अंकाचे मंत्रालयात प्रकाशन

मुंबई: राज्याचे उप मुख्यमंत्री मा.ना. अजित दादा पवार यांचे हस्ते गोरेगाव मिरर च्या दिवाळी अंकाचे आज मंत्रालयात प्रकाशन पार पडले.
या वेळी गृह मंत्री मा.ना. दिलीप वळसे पाटील, सामाजिक न्याय मंत्री मा.ना.धनंजय मुंडे, अर्थतज्ञ व माजी राज्यसभा सदस्य श्री. भालचंद्र मुणगेकर तसेच मुंबईचे पोलिस आयुक्त श्री.हेमंत नगराळे आदि उपस्थित होते. कोरोना काळात देखील गोरेगाव मिरर ने दाखविलेले सातत्य कौतुकास्पद असून दिवाळी अंकाची जुनी परंपरा कायम राखण्यात हातभार लावणे हे देखील महत्वाचे कार्य संपादक महेश पावसकर यांनी पार पाडले आहे. असे प्रतिपादन उप मुख्यमंत्री अजित दादा पवार यांनी केले, तर उत्कृष्ट छपाई व दर्जा बाबत कोणतीही तडजोड न करणे हे देखील उल्लेखनीय असल्याचे गृह मंत्री दिलीप वळसे पाटील यांनी सांगितले.