गोरेगाव मिररमुंबई
आदिवासी पाड्यातील नागरिकांकरिता एक दिवसीय लसीकरण शिबीर..
उप महापौर अॅड. सुहास वाडकर यांचे विशेष सहकार्य.

मुंबई:शिवसेना नेते, खासदार श्री. गजानन कीर्तिकर, विभागप्रमुख, आमदार, माजी महापौर श्री. सुनील प्रभू यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच मुंबई चे उपमहापौर प्रभाग क्र. ४० चे नगरसेवक अॅड. सुहास चंद्रकांत वाडकर यांच्या माध्यमातून व मनपा पी/उत्तर विभागाच्या वैद्यकीय अधिकारी डॉ. ऋतुजा बारस्कार, सहाय्यक वैद्यकीय अधिकारी डॉ. प्रशांत जाधव, डॉ. विकास लोखंडे, रिद्धी गार्डन मनपा दवाखान्याचे नोडल अधिकारी डॉ. अक्षय पळसंबकर यांच्या विशेष सहकार्यामुळे गुरुवार, दिनांक १९ ऑगस्ट २०२१ रोजी बारीक पायरी भाटुंगली पाडा क्र. ०१, बारीक पायरी भाटुंगली पाडा क्र. ०२ व लिंबूनी पाडा ह्या तीन आदिवासी पाड्यातील नागरिकांकरिता एक दिवसीय लसीकरण शिबिर घेण्यात आले. एकूण २०७ नागरिकांनी लसीकरणाचा लाभ घेतला.