मालाड येथील महापालिकेच्या मैदानाला टिपू सुलतानाचे नाव दिल्याने भाजप आक्रमक: हा तर निर्लज्जपणाचा कळस- देवेंद्र फडणवीस

मुंबई:- मालाड येथील मैदानाचे नामकरण टिपू सुलतान यांच्या नावाने करण्यावरून शिवसेना आणि भाजप आमने-सामने आल्याचे पाहायला मिळत आहे.टिपू सुलतान यांच्या नावाला भाजपकडून तीव्र विरोध होत असून आज या मैदानाबाहेर भाजप आणि बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांनी मोठ्या प्रमाणात निदर्शने केल्याचे पाहायला मिळालं.यावेळी पोलिसांनी या कार्यकर्त्यांना ताब्यात घेत परिस्थिती नियंत्रणात आणली.दरम्यान आंदोलनात अतुल भातखळकर व काही भाजप नेते होते.त्यांनाही पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.
मालाडमधील क्रीडा संकुलाला टिपू सुलतानचे नाव देण्यावरुन मुंबईतील राजकारण चांगलच तापलं आहे. भाजपा आणि बजरंग दलाकडून या नामकरणाला विरोध करण्यात येत आहे.
देशात एपीजे अब्दुल कलामसारखे लोक होऊन गेलेत, त्यांचं नाव द्या पण टिपू सुलतान यांचं नाव देण्यात येऊ नये, अशी मागणी यावेळी आंदोलनकर्त्यांनी केली. यावर विरोधीपक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी प्रतिक्रिया देत,हा राज्य सरकारच्या निर्लज्ज पणाचा कळस आहे,असं मत व्यक्त केलं आहे.त्यामुळे येत्या काळात हा वाद आणखीन चिघळण्याची शक्यता आहे.