मुंबईमहाराष्ट्र

देवेंद्र फडवणीस मुख्यमंत्री तर एकनाथ शिंदे अन् अजित पवार उपमुख्यमंत्री पदी विराजमान

पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या उपस्थिती पार पडला शपथविधी सोहळा, दिग्ग्ज नेत्यांची उपस्थिती...

मुंबई : महाराष्ट्राच्या 14 व्या विधानसभा निवडणुकीत विजय मिळवल्यानंतर महायुतीचे मुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली. तर शिवसेनेचे मुख्य नेते एकनाथ शिंदे यांनी हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांना वंदन तसेच आनंद दिघे यांचे स्मरण करत उपमुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली. यावेळी देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी व गृहमंत्री अमित शहा यांचे आभार मानले. तसेच राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष अजित पवार यांनी राज्याचे उपमुख्यमंत्री म्हणून महाराष्ट्राचे राज्यपाल सी.पी. राधाकृष्णन यांनी त्यांना पद आणि गोपनीयतेची शपथ दिली. यावेळी या शपथविधी सोहळयाला देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह, केंद्रीय संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांच्यासह उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ, उत्तराखंडचे मुख्यमंत्री पुष्कर सिंह धामी ते बिहारचे मुख्यमंत्री नितीशकुमार यांच्यासह विविध राज्यांचे मुख्यमंत्री यांच्या उपस्थितीत शपथविधी सोहळा पार पडला. या शपथविधी सोहळ्याला महायुतीचे राज्यभरातील समर्थक, कार्यकर्ते उपस्थित होते. सिनेसृष्टीमधील दिग्गजांनी देखील या सोहळ्याला हजेरी लावली.

महाराष्ट्राचे मुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस यांनी तिसऱ्यांदा शपथ घेतली आहे. 2014-2019 या कालावधीत त्यांनी पहिल्यांदा राज्याचं मुख्यमंत्रिपद भूषवलं. 2019 मध्ये भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या सरकारचे ते 72 तासांसाठी मुख्यमंत्री होते. त्यानंतर आज ते तिसऱ्यांदा मुख्यमंत्री झाले आहेत. महाराष्ट्राच्या विधानसभा निवडणुकीत महायुतीनं 288 पैकी 236 जागांवर विजय मिळवला. भाजपला 132, शिवसेनेला 57 आणि अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसला 41 जागा मिळाल्या. महायुतीच्या सरकारचे मुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस यांनी शपथ घेतली.

शिवसेनेचे मुख्य नेते एकनाथ शिंदे यांनी अखेर मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली आहे. 2014-2019 या काळात प्रथम महाराष्ट्राचे विरोधी पक्षनेते, त्यानंतर राज्य सरकारमध्ये नगरविकास खात्याचे मंत्री म्हणून त्यांनी काम केलं. एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरेंच्या सरकारमध्ये देखील ते नगरविकास मंत्री होते. यानंतर शिवसेना आणि भाजपचं सरकार स्थापन झालं तेव्हा एकनाथ शिंदे मुख्यमंत्री होते. देवेंद्र फडणवीस यांच्या सरकारमध्ये ते उपमुख्यमंत्री झाले आहेत.

महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री म्हणून अजित पवार यांनी सहाव्यांदा शपथ घेतली. 2019-2024 या कालावधीतील तीन राज्य सरकारांमध्ये अजित पवार राज्याचे उपमुख्यमंत्री होते. अजित पवार 2010 मध्ये पहिल्यांदा उपमुख्यमंत्री झाले होते. आज त्यांनी देवेंद्र फडणवीस यांच्या सरकारमध्ये दुसऱ्यांदा उपमुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button
error: Content is protected !!