मुंबई: जगातील सर्वोत्तम समजल्या जाणाऱ्या स्कॉटलंड यार्ड पोलिसांबरोबर ज्यांची तुलना केली जाते त्या मुंबई पोलीस दलाची प्रतिमा सध्या काही बदनाम पोलीस अधिकाऱ्यांमुळे डागाळली गेली आहे. यावर तोडगा म्हणून राज्याच्या पोलीस महासंचालक पदाची अलीकडेच सूत्रे घेतलेल्या संजय पांडे यांनी अनेक उपाय योजणे सुरु केले आहे. याचाच एक भाग म्हणून आता मुंबई पोलीस दलात ८ वर्षांहून जास्त काळ सेवा देणाऱ्या पोलीस निरीक्षक, सहाय्यक निरीक्षक व उपनिरीक्षकांच्या मुंबई बाहेर बदल्या करण्याचे महासंचालकांनी निश्चित केले आहे.
यामध्ये नवी मुंबई, ठाणे आणि पुणे येथील अधिकाऱ्यांचा देखील समावेश आहे. डीजीपी संजय पांडे यांनी संबंधित पोलिस आयुक्तालयाला एकाच शहरात ८ वर्षांपेक्षा जास्त काळ घालवलेल्या पीआय, एपीआय, पीएसआयची यादी पाठविण्याचे आदेश दिले आहेत. यासंदर्भात एक परफॉर्मा देखील तयार करण्यात आला आहे, बदली साठी पात्र अधिकाऱ्यांना त्यांच्या पसंतीच्या तीन जिल्ह्यांची निवड करायची मुभा देण्यात आली असून या मध्ये ज्यांना त्यांच्या मूळ जिल्ह्यात बदली हवी असेल त्या जिल्ह्याचा समावेश देखील करण्यात आला आहे. ही बदली ची प्रक्रिया अनिवार्य असून बदली साठी पात्र असलेली नावे बदली यादीमध्ये नमूद केली आहेत.
ठाणे येथील कार डीलर मनसुख हिरेन यांच्या हत्येप्रकरणी अटक झालेल्या माजी एपीआय सचिन वाझे यांच्या अटकेच्या घटनेनंतर हा निर्णय घेण्यात आला असल्याचे बोलले जात आहे.
पोलीस दलातील बदलींची यादी
District Transfer Name