गोरेगाव मिरर

गोरेगाव येथे श्री दत्त जयंतीनिमित्त कोरोनाचे नियम पाळून सामाजिक कार्यक्रमांचे आयोजन

मुंबई दि १८ – गोरेगाव (पूर्व) आरे रोड येथील स्टेशन नजिक असलेल्या बाबू सायकल वाडीत श्री गुरुदत्त सेवा मंडळातर्फे सालाबादप्रमाणे यावर्षीही दत्तजयंती उत्सव आमदार व विभागप्रमुख, माजी महापौर सुनील प्रभू यांच्या मार्गदर्शनाखाली कोरोनाचे नियम पाळून साजरा होत आहे. यानिमित्त श्री गुरुचरित्र पारायण, भजन, कीर्तन, काकड आरती, श्री दत्त पादुका पालखी मिरवणूक असे विविध धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.

गेली ४३ वर्षे वर्षभर अनेक धार्मिक कार्यक्रमांबरोबर सामाजिक कार्यक्रमांचे सातत्याने आयोजन या मंडळातर्फे करण्यात येते. आज दुपारी अपंगांना तीन चाकी सायकल वाटप आणि व्हीलचेअरचे वाटप व गरजू नागरिकांना एक महिना पुरेसे धान्य वाटप करण्यात आले. यावेळी आमदार सुनील प्रभु, स्थापत्य समिती अध्यक्ष (उपनगरे) स्वप्निल टेंभवलकर, नगरसेविका व विभागसंघटक साधना माने, नगरसेविका रेखा रामवंशी, शाखाप्रमुख अजित भोगले, दिपक रमाणे, मंडळाचे सल्लागार सुधाकर देसाई, अध्यक्ष रविंद्र आडिवरेकर, डॉ. हेमचंद्र सामंत व इतर पदाधिकारी उपस्थित होते.

या मंडळाच्यावतीने, कोरोना काळात धान्य वाटप, दुष्काळ ग्रस्त शेतकऱ्यांना मदत, महापौर निधीस आर्थिक मदत, विभागातील कॅन्सर ग्रस्त नागरिकांना मदत केली जाते तसेच वर्षभर विद्याथींना वह्या वाटप, विद्याथींचा कौतुक सोहळा, महिलांसाठी हळदी कुंकु समारंभ, गुढीपाडवा, होळी उत्सव, दहीहंडी उत्सव व श्री दत्तगुरुंचे संपूर्ण धार्मिक कार्यक्रम वर्षभर केली जातात अशी माहिती सुधाकर देसाई व रवींद्र आडीवरेकर यांनी दिली.

दत्तजयंती निमित्त उत्सवामध्ये आयोजीत विविध कार्यक्रमांना प्रतिवर्षी प्रमाणे खासदार गजानन कीर्तिकर, उद्योग मंत्री सुभाष देसाई, युवासेना सरचिटणीस अमोल कीर्तिकर, युवा सेना कार्यकारिणी सदस्य अंकीत प्रभू व अनेक मान्यवर आवर्जून उपस्थित राहिले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button
error: Content is protected !!