जेवल्या-जेवल्या झोप लागते? वेळीच सावध व्हा नाहीतर या गंभीर परिणामांना सामोरे जा

आज बदलेल्या जीवनशैलीमुळे लठ्ठपणाचे प्रमाण समाजामध्ये अनेकांना दिसून येत आहे. आज ताणतणावपूर्ण, अनियमित जीवनशैली आणि वाईट सवयीमुळे लठ्ठपणा सोबतच इतर अनेक समस्या माणसाला निर्माण होऊ शकतात. त्यामुळे आपण सर्वांनी आरोग्याकडे विशेष लक्ष दिले पाहिजे.
काहींच्या वाईट सवयींमध्ये उशीरा जेवणे आणि लगेच झोपणे यांचा समावेश होतो. वास्तविक ही समस्या नवीन आहे असे नाही, त्याबद्दल सर्वांनी आधी वाचले किंवा ऐकले असेल पण तरीही काहीजण त्याकडे दुर्लक्ष करत राहता. कोणत्या सवयीमुळे आरोग्याशी संबंधित समस्या उद्भवू शकतात, त्याबद्दल थोडेसे जाणून घेऊ या.
१) लठ्ठपणा वाढतो-
रात्रीचे जेवण झाल्यावर लगेच झोपू नये. पण आपण हे नियम पाळत नाही आणि अनेकदा रात्री उशिरा जेवल्यानंतर लगेच झोप येते. अलीकडेच शास्त्रज्ञांना संशोधनात असे आढळून आले आहे की, रात्री जेवल्यानंतर लगेच झोपल्याने लठ्ठपणा वाढतो.
२) रक्तातील साखरेची पातळी-
जेवणानंतर शरीरातल्या रक्तातील साखरेची पातळी वाढते. शास्त्रज्ञांचे म्हणणे आहे की, रात्री जेवल्यानंतर लगेच झोपल्याने रक्तातील साखरेची पातळी खूप गंभीर होऊ शकते. त्यामुळे वजन तर वाढतेच पण अनेक आजारही होतात.
३) ग्लुकोजची पातळी-
रात्री उशिरा अन्न खाल्ल्याने शरीरातील ग्लुकोजची पातळी बिघडते. याचा परिणाम मेटाबॉलिज्मवर होतो आणि लठ्ठपणा झपाट्याने वाढू लागतो. याशिवाय त्याचा झोप आणि आरोग्य या दोन्हींवर परिणाम होतो.
४) पचन मंदावते-
जेवल्यानंतर लगेच झोपल्याने पचनासह शरीरातील अनेक कार्ये मंदावतात. पचनाची प्रक्रिया मंद असल्याने रात्री जेवल्यानंतर लगेच झोपायला गेल्यावर अन्नाचे पचन व्यवस्थित होत नाही. त्यामुळे बद्धकोष्ठता, पोट फुगणे, अपचन अशा अनेक समस्या उद्भवू शकतात.