
मुंबई: मुंबई मेट्रोमध्ये प्रथमच महिला ट्रॅफिक कंट्रोलर (वाहतूक नियंत्रक) होण्याचा बहुमान रत्नागिरीच्या कन्येला मिळाला आहे. सौ. शुभ्रा मोहिते या रत्नागिरी शहरातील माळनाका येथील रहिवासी आहेत. त्यांनी हा मान मिळविला आहे.
मुंबई मेट्रो मार्ग 2 व मेट्रो 7 चे उदघाटन झाले आहे. पहिल्या टप्प्यामध्ये २० किलोमीटर मार्गावरील वाहतूक सुरू झालेली आहे. मेट्रो 7 या मार्गावर एकत्रितपणे पहिल्या टप्प्यामध्ये 20 किलोमीटर मार्गावरील वाहतूक सुरू झाली. त्यानंतर या मार्गाच्या दुसऱ्या टप्प्यात 15 कि.मी. मार्गावर मेट्रो चालवण्यात येणार आहे.
सौ. शुभ्रा मोहिते या रत्नागिरी, माळनाका येथील मूळच्या रहिवासी आहेत. त्यांनी 2010 साली रत्नागिरीतील एका अभियांत्रिकी महाविद्यालयात इलेक्ट्रॉनिक्स इंजिनिअरिंग चे इंजिनियरिंग शिक्षण केलेले आहे. त्यानंतर त्यांनी सांगली येथे एम. टेक झाल्यानंतर आयआयएम अहमदाबाद येथे नोकरी पत्करली.
सौ. शुभ्रा मोहिते या सप्टेंबर 2020 पासून मुंबई मेट्रोमध्ये ट्रॅफिक कंट्रोलर म्हणून काम करत आहेत. मुंबई मेट्रोच्या प्रथम महिला ट्रॅफिक कंट्रोलर होण्याचा बहुमान रत्नागिरीच्या या कन्येला मिळाला आहे. शुभ्रा यांचे पती सुरज शशिकांत मोहिते हे केंद्रीय उर्जा खात्यात कार्यरत आहेत. तर रत्नागिरी तालुक्यातील शिक्षण विभागात खालगाव बिटच्या विस्तार अधिकारी सौ. सशाली मोहिते आणि रत्नागिरी एसटी आगाराचे माजी आगार व्यवस्थापक शशिकांत मोहिते यांच्या त्या स्नुशा आहेत. रत्नागिरीमधून त्यांच्या कामगिरीचे कौतूक होत आहे.