ब्रेकिंग
भाजप नेते किरीट सोमय्यांच्या पुणे दौऱ्यादरम्यान शिवसैनिकांचा राडा,गाडी अडवण्याचा शिवसैनिकांनी केला प्रयत्न

पुणे:- पुण्यामध्ये भाजप नेते किरीट सोमय्यांविरोधात शिवसैनिक आक्रमक झाल्याचं पाहायला मिळालं. आज शिवसैनिकांनी पुण्यामध्ये किरीट सोमय्या यांच्या दौऱ्यादरम्यान मोठा राडा केला. यावेळी शिवसैनिकांकडून किरीट सोमय्या यांची गाडी अडवण्याचा देखील प्रयत्न झाला.
किरीट सोमय्या यांनी पत्रकार परिषद घेत खासदार संजय राऊत यांची पोल खोल करणार असल्याचा दावा केला होता. यामुळेच आक्रमक झालेल्या शिवसैनिकांनी आज किरीट सोमय्या यांचा दौरा रोखण्याचा प्रयत्न केला. यावेळी शिवसैनिकांनी जोरदार घोषणाबाजी देखील केल्याचं पाहायला मिळालं.
भाजपच्या नेत्यांचे कारनामे सोमय्या यांना दिसत नाहीत का असा सवाल उपस्थित करत, किरीट सोमय्या यांच्या गाडीवर हात मारत किरीट सोमय्या यांचा शिवसैनिकांनी निषेध व्यक्त केला. दरम्यान पोलिसांनी शिवसैनिकांना अडवत किरीट सोमय्या यांना सुरक्षेत बाहेर काढलं.