*…आता ‘सेंट्रल विस्टा’ विरोधात भारत’ या जनआंदोलनाची हाक*

मुंबई : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेतून दिल्ली येथे सेंट्रल विस्टा इमारत उभारली जात आहे. सेंट्रल विस्टा या जनता विरोधी अर्थात भारत विरोधी प्रकल्पालावर होणारा अवाढव्य खर्च, कोरोना संकटात जनतेच्या आरोग्यावर करण्यात यावा याकरिता मुंबईतील शेकापच्या मध्यवर्ती कार्यालयात बैठक पार पडली. या बैठकीस विविध पक्ष, संघटनांचे प्रतिनिधी उपस्थित होते. या बैठकीत सेंट्रल विस्टा विरोधी भारत या नावाने जनआंदोलन उभे करण्याचा निर्धार एकमताने करण्यात घेण्यात आला.15 जून 2021 रोजी दुपारी 3वाजता आंदोलन करण्याचे यावेळी ठरविण्यात आले.

उपस्थित प्रतिनिधींपैकी अनेकांनी “सेंट्रल विस्टा” आणि त्यावरचा भरमसाठ खर्च आपल्या देशासाठी अनावश्यक असल्याचं मत नोंदवलं. सेंट्रल विस्टावर होणारा अवाढव्य खर्च, भारतीय जनतेच्या आरोग्य सुविधांवर खर्च करण्यात यावा म्हणून हि नवगठीत समिती चळवळ करेल असे या बैठकीत ठरविण्यात आले.
15 जून 2021 रोजी दुपारी 3वाजता आंदोलन करण्याचे यावेळी ठरविण्यात आले. सर्व राजकीय पक्ष्यांच्या प्रमुखास या आंदोलनात सहभागी करून घेण्याचे ठरले. पुढील कामकाज व नियोजन करण्यासाठी, माजी आमदार विदयाताई चव्हाण, आ. आबू आझमी, डॉ विवेक कोरडे, डॉ निलेश पावसकर, राजू कोरडे, शैलेंद्र कांबळे, विशाल हिवाळे आदींची निमंत्रित समिती बनविण्यात आली.