रायगड मध्ये लॉकडाऊन अंशतः शिथील…
किराणा, भाजीची दुकाने, या सह हार्डवेअर सामान विक्री करणारी दुकाने पूर्ण वेळ राहणार सुरु
रायगड,दि. २०: राज्यात कोरोना विषाणूचा प्रादूर्भाव रोखण्यासाठी लागू केलेल्या निर्बंधांनुसार सर्व किराणा, भाजीची दुकाने, फळ विक्रेते, दूध डेअरी, बेकरी, मिठाई, खाद्यपदार्थ दुकाने (चिकन, मटण, पोल्ट्री, मच्छी व अंडी), कृषी अवजारे व शेतातील उत्पादनांशी संबंधित दुकाने, पाळीव प्राण्यांच्या खाद्यपदार्थाची दुकाने, व्यक्तींसाठी तसेच आस्थापनांसाठी पावसाळयापूर्वी करण्यात येणाऱ्या कामाकरीता लागणाऱ्या साधनसामुग्री संबंधित दुकाने फक्त सकाळी ७ ते सकाळी ११ वाजेपर्यंतच चालू राहतील, असे आदेश पूर्वी पारीत करण्यात आले होते. मात्र
१७ मे रोजी आलेल्या ताऊक्ते चक्रीवादळा च्या पार्श्व्भूमीवर मर्यादित वेळेत सुरु ठेवण्यात आलेल्या विशिष्ट आस्थापना व दुकाने यांना पूर्वीच्या निर्बंधातून वगळून पुढील आदेश होईपर्यंत नियमितपणे पूर्ण वेळ सुरु ठेवण्यास जिल्हा प्रशासनाने परवानगी दिली आहे.
चक्रीवादळामुळे प्रभावित झालेली घरांची मजूरांच्या सहाय्याने दुरुस्तीची / पुर्नबांधणीची कामे कोविड प्रतिबंधात्मक उपाययोजनांचे काटेकोरपणे पालन करीत सुरु ठेवण्यासाठी जिल्हाधिकारी तथा जिल्हादंडाधिकारी श्रीमती निधी चौधरी यांनी परवानगी दिली आहे. घर, वाडे, गोठे इत्यादींचे मोठ्या प्रमाणात झालेले नुकसान व त्यानुषंगाने उद्भवलेली आपत्तीजन्य स्थिती विचारात घेता व नागरिकांना त्यांच्या नुकसानग्रस्त घर, वाडे, गोठे इत्यादी वास्तूची तात्काळ दुरुस्ती/पुर्नबांधणी करणे आवश्यक असल्याने त्या दृष्टीने जिल्ह्यात निर्बंधीत केलेल्या आस्थापना/दुकानांपैकी किराणा, भाजीची दुकाने, फळ विक्रेते, चिकन/ मटण/मासळी विक्रेते, रास्तभाव धान्य दुकाने, फॅब्रिकेशन कामे करणाऱ्या आस्थापना, दूध डेअरी, अवजारे व शेतातील उत्पादनांशी संबंधित दुकाने, पावसाळ्या पूर्वी करण्यात येणाऱ्या कामाकरीता लागणारी साधनसामुग्री उदा. सिमेंट, पत्रे, ताडपत्री, विद्युत उपकरणे, हार्डवेअर सामान विक्री करणारी दुकाने यांना पूर्वीच्या निर्बंधातून वगळून पुढील आदेश होईपर्यंत नियमितपणे पूर्ण वेळ सुरु ठेवण्यास तसेच मजूरांच्या सहाय्याने दुरुस्तीची / पुर्नबांधणीची कामे करण्यासाठी कोविड प्रतिबंधात्मक उपाययोजनांचे काटेकोरपणे पालन करण्याच्या अधीनतेने सुरु ठेवण्यासाठी परवानगी दिली गेली आहे.
शासकीय आदेश
Order No.524..Tauktae.. shops open 2