ब्रेकिंग
खासदार संजय राऊत यांचे निकटवर्तीय प्रवीण राऊत यांना ईडीकडून अटक

मुंबई:- शिवसेना खासदार संजय राऊत यांचे निकटवर्तीय प्रवीण राऊत यांना ईडीकडून अटक करण्यात आली आहे. एचडीआयएलमधील १ हजार ३४ कोटींच्या पत्राचाळ जमीन घोटाळ्यात सहभाग असल्याचा प्रवीण राऊत यांच्यावर आरोप आहे.याच आरोपावरून प्रवीण राऊत यांना ईडीकडून अटक करण्यात आली आहे.
एचडीआयएलमधील १ हजार ३४ कोटींचा पत्राचाळ जमीन घोटाळा गेल्या अनेक वर्षांपासून चर्चेत आहे.ईडी सातत्याने या घोटाळ्याचा तपास करत आहे.दरम्यान ईडीने या घोटाळ्यांशी संबंधित अनेकांची चौकशी देखील केली आहे.
यात प्रवीण राऊत यांचीही गेल्या अनेक महिन्यांपासून चौकशी सुरू होती. या चौकशी दरम्यान या घोटाळ्यांशी प्रवीण राऊत यांचा संबंध आहे,हे स्पष्ट झाल्यानंतरच ईडीने ही कारवाई केली आहे.