शिवसेनेला ईडीचा दुसरा दणका, प्रताप सरनाईकांची ११.३५ कोटींची संपत्ती ईडीने केली जप्त

मुंबई-आठवडाभरातच ईडीने शिवसेनेला दुसरा मोठा धक्का दिला आहे. दोन दिवसांपूर्वी ईडीने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे मेव्हुणे श्रीधर पाटणकर यांच्यावर कारवाई करुन त्यांची संपत्ती जप्त केली होती.
त्यानंतर आज पुन्हा ईडीने मोठी कारवाई करत शिवसेना आमदार प्रताप सरनाईक यांची मालमत्ता जप्त केली आहे. काही महिन्यांपूर्वी ईडीकडून प्रताप सरनाईकांची आणि त्यांच्या मुलाची चौकशी करण्यात आली होती. परंतु मध्यंतरी तो तपास थंडावला होता.
त्यानंतर प्रताप सरनाईकांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरें यांना पत्र लिहिले आणि भाजपशी जुळवून घेण्याचा सल्ला दिला होता. तेव्हापासून प्रताप सरनाईक यांच्यावर कोणत्याही प्रकारची कारवाई नाही झाली.
मात्र,आता ईडीने प्रताप सरनाईकांना धक्का देत ११.३५ कोटी रुपयांची संपत्ती तसेच ठाण्यातील दोन फ्लॅट आणि काही जमीन जप्त केल्या आहेत. ईडीच्या माहितीनुसार, एनएसईएल आर्थिक गैरव्यवहार प्रकरणात ही कारवाई करण्यात आली आहे. हा शिवसेनेसाठी मोठा झटका मानला जात आहे.