
मुंबई:- अभिनेत्री ऐश्वर्या राय हिला ईडीने समन्स बजावल्याची माहिती समोर आली आहे. पनामा पेपर लीक प्रकरणी बॉलीवूड अभिनेत्री ऐश्वर्या रायला ईडीकडून हे समन्स बजावण्यात आलं आहे.पनामा पेपरप्रकरणी दाखल करण्यात आलेल्या मनी लॉंडरिंग केसमध्ये ऐश्वर्याचं नाव असल्याने हे समन्स बजावण्यात आल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे.
काय आहे पनामा पेपर लीक प्रकरण ?
पनामा येथील एका लॉ फर्मचे काही गोपनीय कागदपत्रे लीक करण्यात आली आहेत, त्यामुळे जगभरातील अतिश्रीमंत, बडे राजकारणी, देशांचे प्रमुख त्यांच्याकडील ब्लॅकमनी कसा सुरक्षित ठेवतात किंवा कसे विदेशात पाठवतात याचा उल्लेख आहे.ही कागदपत्रे लीक प्रकरणात बच्चन परिवाराचा हात असल्याचा संशय घेत ऐश्वर्याला हे समन्स पाठवण्यात आलं आहे.
दरम्यान,माध्यमातील रिपोर्टनुसार, बिग बी अमिताभ बच्चन,अभिनेत्री ऐश्वर्या राय-बच्चन,डीएलएफचे केपी सिंह,उद्योगपती अडाणी यांचे मोठे बंधू,इकबाल मिर्ची यांचा पनामा पेपर प्रकरणात समावेश असल्याचे समजते आहे.