शासन आणि प्रशासन यांनी एकत्रितपणे एकमेकांमध्ये समन्वय साधून काम केल्यास जिल्ह्याचा अधिक विकास -मंत्री उदय सामंत

रत्नागिरी – शासन आणि प्रशासन यांनी एकत्रितपणे एकमेकांमध्ये समन्वय साधून काम केल्यास जिल्ह्याचा अधिक विकास साधता येईल.विकासात्मक कामे करण्यासाठी आपण कटिबद्ध आहोत.रत्नागिरी जिल्हापरिषदेच्या नवीन इमारतीसाठी ५८ कोटी रूपये मंजूर झाले आहेत.लवकरच जिल्हयाच्या प्रशासकीय इमारतीसाठी ५२ कोटी रूपये मंजूर होणार आहेत, असे प्रतिपादन राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांनी केले.
जिल्हा परिषद रत्नागिरीच्या सभागृहाच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते. या सभागृहाला हिंदूह्रदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांचे नाव देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. यावेळी जिल्हा परिषदेचे अध्यक्ष विक्रांत जाधव, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.इंदूराणी जाखड, शिवसेनेचे सहसंपर्क प्रमुख व माजी जि.प. अध्यक्ष राजेंद्र महाडिक,जिल्हाप्रमुख विलास चाळके,जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष उदय बने, रत्नागिरीचे नगराध्यक्ष प्रदीप साळवी, शिक्षण व अर्थ सभापती चंद्रकांत मणचेकर, महिला व बाल कल्याण सभापती श्रीमती सरवणकर, समाज कल्याण सभापती परशुराम कदम, माजी जिल्हा परिषद अध्यक्ष राजाभाऊ लिमये, रचना महाडिक,स्वरूपा साळवी आणि रोहन बने आदी मान्यवर उपस्थित होते.
यावेळी उदय सामंत म्हणाले की, एक चांगले सभागृह आपण उभारले आहे. सभागृह हे जिल्हयाचे विकासाचे मंदिर आहे. सभागृहाचा आदर्श राज्यातील जिल्हापरिषदांनी घेतला पाहिजे अशी कार्यप्रणाली झाली पाहिजे असेही ते म्हणाले.