गोरेगाव मिररमंत्रालयमुंबई
आ.सुनिल प्रभु यांच्या प्रयत्नाने दिंडोशी-आप्पा पाडा येथील डॉ. आंबेडकर व जामऋषी नगर वसाहतीतील नागरिकांना होणार घरगुती दराने विजपुरवठा..

मुंबई: दिंडोशी विधानसभा क्षेत्रातील आप्पा पाडा येथील डॉ. आंबेडकर व जामऋषी नगर वसाहतीतील नागरिकांना घरगुती दराने वीज उपलब्ध करून देण्यासाठी उपाययोजना करण्याचे निर्देश ऊर्जा मंत्री डॉ. नितीन राऊत आज अदानी इलेक्ट्रिसिटीला या विषयावरील आढावा बैठकीत दिले.
आमदार,विभाग प्रमुख माजी महापौर सुनिल प्रभु यांच्या विशेष प्रयत्नामुळे व पाठपुराव्या मुळे सदर बैठक मंत्रालयात आयोजीत करण्यात आली होती. सदर बैठकीस आमदार सुनिल प्रभु उपस्थित होते.