क्राइमब्रेकिंगमहाराष्ट्र
Breaking-परिवहन मंत्री अनिल परब यांच्या ,शासकीय व खासगी निवासस्थानी ईडीची ने टाकले छापे… कारवाई सुरू
अनिल परब यांनी आता कपड्याची बॅग तयारी ठेवावी: किरीट सोमय्या

मुंबई:शिवसेना नेते आणि राज्याचे परिवहन मंत्री अनिल परब यांच्या शासकीय तसेच खासगी निवासस्थानी ईडीने छापेमारी सुरु केली आहे.
अनिल परब यांच्याशी संबंधित मुंबई आणि पुणे येथील एकूण सात ठिकाणी ईडीची छापेमारी सुरु असल्याचे समजते. ईडीची एक टीम आज सकाळी साडेसहा वाजता अनिल परब यांच्या शिवालय या निवासस्थानी पोहोचली. दरम्यान, अनिल परब यांनी आता कपड्याची बॅग तयारी ठेवावी, असा इशारा भाजप नेते किरीट सोमय्या यांनी दिला आहे.